उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत
बारावीच्या
निकालाबाबत मूल्यमापन पद्धती निश्चित
अमरावती
दि.8 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक
व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित करण्यात
येणारी उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.12 वी) परिक्षा कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे
शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने शासन निर्णयातील तरतुदीनुसार मंडळामार्फत मूल्यमापन प्रकिया
पूर्ण करण्याचा तपशील, सूचना व वेळापत्रक मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेले असून त्याची
कार्यपध्दती तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात मंडळामार्फत
आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमित,
पुर्नपरिक्षार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअतंर्गत प्रविष्ट विद्यार्थी यांचे मूल्यमापनाबाबतचा
तपशील व विषयनिहाय परिशिष्टे याबाबतचे परिपत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून
देण्यात आलेले आहेत.
ही मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशिल, सूचना, मूल्यमापनाबाबतचे विषयनिहाय
नमुने व वेळापत्रक इ. बाबतचे परिपत्रक व परिशिष्टे याची सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षक यांनी
नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. तसेच शासन निर्णय व उपरोक्त परिपत्रकानुसार बारावीच्या
मूल्यमापन कार्यपध्दती संदर्भात प्रशिक्षणाचा व्हिडाओ मंडळाच्या यु-टयुब चॅनलवर http://mh-sscacin/faq या लिंकवर दि.7 जुलै 2021 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आला
आहे.
सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक
व संबंधित शिक्षक यांनी त्यानुसार प्रशिक्षण
घेऊन पुढील कार्यवाही करावी. असे राज्यमंडळाचे
सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा