शुक्रवार, ९ जुलै, २०२१

विभागीय लोकशाही दिन 12 जुलै रोजी

 

विभागीय लोकशाही दिन

12 जुलै रोजी

अमरावती, दि. 8:   दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 12 जुलै  रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी पोस्टाद्वारे किंवा dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com  या संकेस्थळावर सादर कराव्या. लोकशाही दिनात नागरिक व्यक्तीश हजर राहू शकतात, असे  उपआयुक्त (सा.प्र.) संजय पवार यांनी   प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

यावेळी उपस्थित राहणाऱ्या अर्जदारांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. उपस्थितांनी सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करणे, सामाजिक अंतर ठेवणे, मास्क घालणे आवश्यक राहील. कोविड प्रतिबंधक उपायोजना केल्यानंतरच नागरिकांना कार्यालयात प्रवेश देण्यात येईल, असे उपायुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.

                                                           000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा