खरीप हंगाम 2021
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
अमरावती, दि. 2: येत्या खरीप
हंगामात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात
येत आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय कृषी
सहसंचालक यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार
शेतकऱ्यांनी दिनांक 15 जुलै पर्यंत आपल्या नावाची नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी नोंदणी
करण्याकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि
अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचेशी
संपर्क साधावा, अशी माहिती कृषी सहसंचालक यांनी दिली. शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीसाठी
राष्ट्रीय विमा संकेत स्थळ कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पुढील
कारणांमुळे होणाऱ्या पीकाच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाते. हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ
अधिसुचित मुख्य पिकांची 75 टक्के पेक्षा
जास्त क्षेत्रावर पेरणी / लावणी न झाल्यास, पीक काढणीच्या 15
दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ
इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट झाल्यास, टाळता न येणाऱ्या
जोखमींमुळे, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,
ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग आदींमुळे अधिसुचित
पिकाचे ठरावीक क्षेत्रातील नुकसान झाल्यास निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई
निश्चित केली जाते व योजनेचा लाभ दिल्या जाईल. काढणी पश्चात
नुकसान व स्थानिक
आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित
पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप/संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक/बँक/कृषि व महसूल विभाग यांना
त्वरीत कळवाव. नुकसानाची माहिती देतांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल.
वाशिम
व बुलडाणा जिल्हयासाठी रिलायंस
जनरलइन्शुरन्स कंपनी लि. वेस्टर्न
एक्सप्रेस हायवे, 5 वा मजला, चिंतामणी अव्हेन्यू, विरानी औदयोगीक वसाहती जवळ, गोरेगाव (ई), दुरध्वनी क्र 022-68623005 असून ई-मेल rgcl.pmfby@relianceada.com हा आहे. कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18001024088 हा आहे.
अमरावती, यवतमाळ जिल्हयासाठी इफ्को टोकिओ जनरल
इंन्शुरन्स कं.लि. 10 वा मजला सुनीत कॅपिटल सोसायटी, सेनापती बापट रस्ता,
शिवाजीनगर, पुणे-411016
ई-मेल - supportagri@iffcotokio.co.in टोल
फ्री क्रमांक 18001035490 हा आहे.
अकोला जिल्हयासाठी एचडीएफसी
इर्गो इंन्शुरन्स कं.लि.डी-103 तीसरा मजला, ईर्स्टन बिझनेस डिस्ट्रिक एल.एस.बी.
मार्ग भांडूप (पश्चिम), दुरध्वनीक्र.
+91 2266383600 हा असून ई-मेल - pmfby.maharashtra@hdfcergo.com व टोल फ्री क्रमांक 18002660700 हा आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित
मुदतीपुर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक
कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा असे विभागीय
कृषी सहसंचालक यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा