मंगळवार, २० जुलै, २०२१

अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा 21 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी 26 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे

 

अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा 21 ऑगस्ट रोजी

विद्यार्थ्यांनी 26 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 20: इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थ्यांची एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय राज्य व उच्च माध्यमिक मंडळाने घेतला आहे. सामाईक परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेमध्ये उर्त्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दि. 20 जुलै पासून दि.26 जुलै 2021 पर्यंत संकेतस्थळावर सादर करावे.

सन 2021-22 च्या इयत्ता अकरावी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षा शनिवार दि. 21 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत करण्यात येणार आहे. सामाईक परीक्षा ही राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2021-22 मधील इ. 11 वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक स्वरुपाची राहील. ही परीक्षा ऑफलाईन, बहूपर्यायी प्रश्न स्वरुपाची व ओएमआर आधारीत असेल. विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र सादर करण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा