दहावी व बारावीच्या खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी
12 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करावी
अमरावती,
दि. 16 : शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावी व दहावीच्या
विद्यार्थ्यांनी खाजगीरित्या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नं. 17
भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा शिक्षण मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थ्यांनी
दिनांक 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी व शुल्क ऑनलाईन पदधतीने सादर
करावे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-ssc.ac.in
या
संकेतस्थळावर तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.inया संकेतस्थळावर अर्ज सादर करावा.
दिनांक 17 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत मूळ अर्ज, ऑनलाईन नाव
नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर
नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सादर करावी. दिनांक
18 ऑक्टोबर रोजी संपर्क केंद्र शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी ही कागदपत्रे व यादी
विभागीय मंडळाकडे जमा करावी.
शाळा सोडल्याचा व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा
सोडल्याचा दिनांक ग्राहय धरण्यात येईल. कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दहावी,
बारावीचा 2021 या वर्षाचा निकाल जुलै-ऑगस्ट मध्ये लागलेला असल्याने, खाजगी
विद्यार्थी ऑनलाइन नाव नोंदणीबाबत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावरील शाळा/कनिष्ठ
महाविद्यालय सोडल्याची तारीख 31 ऑगस्ट 2021 अशी ग्राहय धरण्यात येईल. कोविड- 19 मुळे
फक्त 2022 च्या परीक्षेसाठी हे लागू असेल तथापि विद्यार्थ्यांच्या वयासाठी दि. 31
जुलै तारीख राहील. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत
पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या
संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे. ,असे पुणे
राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसल यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा