दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा
सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये
अमरावती,
दि. 1: इयत्ता दहावी व बारावी मुख्य परिक्षेमध्ये अनुत्तीर्ण
तसेच ए. टी. के. टी. साठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर – ऑक्टोबर
2021 मध्ये शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुबंई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,
लातूर, व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येत आहे. दहावीची लेखी परिक्षा
दि. 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर आणि इयत्ता बारावीची (जुना व पुनर्रचित अभ्यासक्रम)
16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर, व्यवसाय अभ्यासक्रमाची 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2021 या
कालावधीत होणार आहे.
तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा दि. 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर
2021 व बारावीची 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर
2021 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या कालावधीत आयोजित केलेल्या परीक्षांचे दिनांकनिहाय
सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscbard.in संकेत स्थळावर दि. 27 ऑगस्ट
2021 पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. परीक्षेपुर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक
शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक
अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी त्या छापील वेळापत्रकांवरुन परीक्षेच्या तारखांची खात्री
करुन परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खासगी
यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारीत झालेले वेळापत्रक
ग्राहय धरु नये. असे विभागीय मंडळाच्या सचिव निलीमा टाके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा