शासकीय अभियांत्रिकी
महाविद्यालयात
राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणम परिषदेची पाहणी व
भेट
अमरावती, दि. 1 : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय मूल्यांकन
व प्रमाणम परिषदेच्या (नॅक) समितीने दि. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी
भेट दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. कुमार वेलांची (माजी कुलगुरु, जवाहरलाल नेहरु
टेक्रॉलॅजिकल विद्यापीठ, काकीनाडा), समितीचे सदस्य डॉ. उत्पल सर्मा (प्राध्यापक, गौहाटी
विद्यापीठ, आसाम) व डॉ. गोपाल क्रीष्णा (संचालक, नागार्जुन अभियांत्रिकी महाविद्यालय,
बंगलूरु) उपस्थित होते.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,
अमरावती चे प्राचार्य डॉ. आर. पी. बोरकर व गुणवत्ता हमी अधिष्ठाता, डॉ. एस. डी. लोंढे
यांनी महाविद्यालयातील अभ्यासक्रम व आदींबाबत समिती समोर सादरीकरण प्रस्तुत केले. दोन दिवसाच्या
कालावधीत नॅक समितीने महाविद्यालयातील संबंधित प्राध्यापक, अशिक्षकीय कर्मचारी, विद्यार्थी,
पालक, माजी विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्राशी संबधित प्रतिनिधी आदींशी संवाद साधून महाविद्यालयाविषयी
त्यांच्या अपेक्षा व मते जाणून घेतली. त्याच बरोबर महाविद्यालयातील आवश्यक त्या शैक्षणिक
सुविधा, प्रयोगशाळा, गंथ्रालय, तांत्रिक सुविधा, इंटरनेट सुविधा, प्रशासकीय व आर्थिक
व्यवस्था, परीक्षा मूल्यमापन पध्दती, चाचणी व सल्लागार सेवा, संशोधनाची गुणवत्ता, अध्यापनाचा
दर्जा, निकालाचे प्रमाण आणि शिक्षणाचा दृष्टिकोन या सारख्या बाबींचे परीक्षण करुन महाविद्यालयानचे
मुल्यांकन केले. मूल्यांकनाच्या नवीन पध्दतीनुसार महाविद्यालयाने नॅक कडे संख्यात्मक
माहितीचा अहवाल आधीच सादर केले होता.
विश्लेषणात्मक मूल्यांकनासाठी
समिती त्यांचे निरीक्षण व परीक्षण केलेला गोपनीय अहवाल बंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन
व प्रमाणम परिषदेकडे सादर करेल. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. बोरकर
व गुणवत्ता हमी अधिष्ठाता डॉ. एस. डी. लोंढे विविध विभाग प्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक
वर्ग, अशिक्षकीय कर्मचारी उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा