नविन परीक्षा केंद्र मागणी
प्रस्ताव सादर करण्यास
31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 30 : शैक्षणिक
वर्ष 2022 मध्ये फेब्रवारी-मार्च महिन्यात
होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांकरीता नविन परीक्षा केंद्र
मागणी प्रस्ताव सादर करण्याकरीता दि. 31 ऑगस्ट 2021 या कालावधीला 31 ऑक्टोबर 2021 पर्यत मुदतवाढ
देण्यात येत आहे, असे विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे काही शाळा, महाद्यिालयांना केंद्र प्रस्ताव सादर न
करता आल्यामुळे मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ फक्त या वर्षाकरीता लागू
राहील. या कालावधित अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्विकृत करण्यात येणार आहे. नविन
प्रस्ताव अर्जाची किमत रुपये 100 निर्धारित करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2021 नंतर
नविन परीक्षा केंद्र मागणी अर्ज स्विकारल्या जाणार नाही असे विभागीय मंडळाने कळविले
आहे.
0000000
वृत्त क्र. 123 दि.- 30 सप्टेंबर 2021
दहावी उत्तीर्ण
विद्यार्थ्यांसाठी
डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष
अनुदान योजना
विद्यार्थ्यांनी
अर्ज सादर करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
अमरावती दि.30 :- इयत्ता दहावी मध्ये 90 टक्के पेक्षा अधिक गुण
मिळवणाऱ्या अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना एमएच-सीइटी, नीट, जेईई या
व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारी करीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विशेष अनुदान योजनेअंतर्गत विशेष
अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मार्च 2021 मधील दहावी उत्तीर्ण
झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येईल. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक
उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून कुटूंबातील कोणताही सदस्य शासकीय, निमशासकीय सेवेत कार्यरत नसावा, स्वघोषणापत्र
पालकांनी देणे आवश्यक आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांच्या पालकांचे जातीचे
प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, रहिवाशी दाखला, शाळा
सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे शिफारस पत्र इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित
प्रती सादर करणे अनिवार्य आहे. अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण
संस्था पुणे यांचे पत्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा. या योजनेच्या अटी व शर्ती ,
निकष व कार्यपध्दती, अर्जाचा नमुना याबाबतची माहिती बार्टीचे संकेतस्थळ https://barti.in/notice-board.php यावर उपलब्ध असल्याची माहीती समाज कल्याण
विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा