शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

6 व 7 ऑक्टोबर रोजी माजी सैनिकांना वैद्यकीय उपचार कार्डाचे वितरण

 

अमरावती, दि. 01 : पुलगाव येथील मिलीटरी स्टेशनचे कमांडर विनय नायर यांच्या आदेशानुसार माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचार न्यू 64 केबी कार्डचे ईसीएचएस वितरण येत्या 6 व 7 ऑक्टोबर रोजी अमरावती येथील पॉलीक्लिनीक हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे.

साधारणत: अमरावती, यवतमाळ येथील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना व ज्येष्ठ माजी सैनिकांना इसीएचएस कार्ड (एक्स-सर्व्हिसमन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्किम) घेण्यासाठी पुलगाव येथील स्टेशन हेडक्वार्टरला 200 कि. मी. अंतर पार करुन जावे लागत असे. मागील वर्षात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता तसेच जाण्यायेण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन, अमरावती येथे वैद्यकीय उपचार कार्डाचे वाटप करुन या समस्येला विनय नायर यांनी सोडविले आहे. पुलगाव स्टेशन कमांडर म्हणून ही त्यांची उत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. बिग्रेडीयर विनय नायर यांनी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील माजी सैनिकांना अमरावतीच्या ईसीएचएस हॉस्पिटलमधून कार्ड वितरण करण्याचे आदेश संबंधित यत्रणांना दिले आहे. माजी सैनिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे प्रशासकीय अधिकारी इसीएचएस पॉलीक्लिनीकचे आर.डी. गौर कर्नल रिटायर्ड  यांनी कळविले आहे. 

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा