विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 व नुतणीकरणाचे अर्ज सादर करावे
महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास
20 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 12 : सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडीबीटी
प्रणालीवर अनुसूचित जातीसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, विजाभजसाठी मॅट्रिकोत्तर
शिक्षण फी परीक्षा फी, इमावसाठी राजश्री शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व
विमाप्र प्रवर्गासाठी व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना
निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात. या योजनेकरीता माहिती व तंत्रज्ञान
विभागामार्फत सन 2020-21 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव
व विमाप्र प्रवर्गाकरीता योजनांचे अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात
आलेली आहे. तसेच सन 2019-20 या वर्षातील नूतनीकरणाचे अर्ज नव्याने सादर (Re-Apply)
करण्याकरीता सुध्दा मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व संस्था व महाविद्यालयांनी
ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलला 20 ऑक्टोबर पर्यत मुदतवाढ देण्यात
आली आहे. त्यासाठी https:// mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरुन
घेण्यात यावे,
तसेच विद्यार्थ्यांनी सादर
केलेल्या अर्जातील संबंधित
महाविद्यालयांनी विद्यार्थ्याकडून त्वरीत त्रुटीपुर्तता करुन घ्यावी.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून विहित वेळेत अर्ज भरुन घ्यावे, असे समाज कल्याण
सहाय्यक आयुक्त श्रीमती माया केदार यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 127 दि.-12ऑक्टोबर 2021
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी खासगीरित्या परिक्षा देण्यासाठी
27 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे
अमरावती
दि. 12:- इयत्ता दहावी व
बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस
प्रविष्ठ होण्याची सुविधा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
त्यानुसार सन 2022 मध्ये होणाऱ्या
दहावी व बारावीच्या परीक्षेस खाजगीरित्या फॉर्म नं. 17 ऑनलाईन प्रक्रियेद्वारे
नियमित शुल्काने भरण्याबाबत मुदतवाढ देण्यात येत आहे. दिनांक 13 ते 27 ऑक्टोबर पर्यंत
विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन सादर करावे. 14 ते 28
ऑक्टोबर विद्यार्थ्यांनी मुळ अर्ज ऑनलाईन
नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन झेरॉक्स प्रत व मुळ कागदपत्रे
अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावी.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक
याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राह्य धरावा, कोविड विषाणूच्या
प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीचा सन 2021 चा निकाल जुलै ऑगस्ट मध्ये लागलेला असल्याने
खाजगी नाव नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याची
तारीख 31 ऑगस्ट 2021 अशी ग्राह्य धरण्यात यावी, सदर बदल कोविडमुळे फक्त सन 2022
च्या परीक्षेपुरताच लागू राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ
व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या
प्राधिकृत केलेल्या दवाखान्यातील प्रमाणपत्राची छायांकित प्रत प्रमाणित करुन
अर्जासाबत सादर करावी. ऑनलाईन अर्ज सादर करतांना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत
दुरध्वनी क्र. 020-25705207/25705271 संपर्क साधावा. पात्र विद्यार्थ्यांना नाव
नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित
केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, असे विभागीय सह सचिव यांनी
कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा