रस्ता दुरूस्ती,सुधारणांची कामे गतीने पूर्ण करावी
पालकमंत्री
ॲड. यशोमती ठाकूर
67 कोटींच्या
विविध विकासकामांचे भूमीपूजन
अमरावती, दि. 18 :जिल्ह्याच्या विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत
महत्वाची असते. दळणवळण व वाहतूकीच्या दृष्टीने दर्जेदार रस्त्यांची निर्मिती
करण्यात यावी व प्रशासकीय यंत्रणेने ही कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश जिल्ह्याच्या
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
केंद्रीय मार्ग निधी
योजनेअंतर्गत कॅम्प शॉर्ट मार्गावरील पंचवटी चौक ते राजपूत ढाबा चौकापर्यंतचे
कॉक्रिंटीकरणाचे सुमारे 62 कोटी रुपये निधीच्या कामाचे भुमिपूजन व अमरावती-बडनेरा मार्गावरील
हॉटेल गौरी इन ते पंचवटी चौक येथील रस्त्याची दुरूस्ती व सुधारणाचे अंदाजे 5 कोटी
रुपये निधीच्या कामाचे भुमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
त्या बोलत होत्या.
भूमिपूजन समारंभाला
खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंत
वानखेडे, महानगर पालिका विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव
देशमुख, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड आदी उपस्थित होते.
यावेळी अधिक्षक अभियंता
अरुंधती शर्मा यांनी रस्ते सुधारणा कामाबाबतची माहिती श्रीमती ठाकूर यांना दिली.
कार्यकारी अभियंता सुनिल थाटोंगे, अभियंता नितीन देशमुख, शाखा अभियंता संदिप ठाकुर
आदी उपस्थित होते.
.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा