शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

विभागीय आयुक्तांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन

 

विभागीय आयुक्त कार्यालय







विभागीय आयुक्तांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन

 

अमरावती, दि. 15 (विमाका) : वाचन प्रेरणा दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात स्थापन करण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते आज करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्ज्वलन करुन फीत कापून वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. उपायुक्त संजय पवार, श्यामकांत मस्के, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, रवि महाले, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, नायब तहसीलदार मधुकर धुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ.पांढरपट्टे यांनी ग्रंथालयातील पुस्तकांची पाहणी केली. प्रशासकीय व कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक संदर्भग्रंथ कार्यालयातच उपलब्ध होणे गरजेचे आहे. विषयानुरुप संदर्भ लगेच प्राप्त झाल्यामुळे शासकीय कामालाही गती येते. यासाठी प्रशासकीय काम करतांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रंथालयातील संदर्भग्रंथ, शासकीय, प्रशासकीय पुस्तकांचा वापर करावा. आवश्यकतेनुसार ग्रंथालयात नविन पुस्तके लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन डॉ.पांढरपट्टे यांनी यावेळी केले. 

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ.कलाम यांना अभिवादन

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला  विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उपायुक्त संजय पवार, श्यामकांत मस्के, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, रवि महाले, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, नायब तहसलिदार मधुकर धुळे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

000000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा