सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

चिखलदरा व धारणी तालुक्यात भरडधान्य खरेदी केंद्रे जाहीर

 चिखलदरा व धारणी तालुक्यात भरडधान्य  खरेदी केंद्रे जाहीर

नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आवाहन

 

          अमरावती, दि.3: आधारभूत किंमत खरेदी योजनेत यंदाच्या खरीप हंगामातील पीकपेऱ्यानुसार भरडधान्य ज्वारी, मका खरेदीसाठी खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत. त्यासाठी शेतकरी बांधवांनी नोंदणी करण्याचे आवाहन आदिवासी विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

मका व ज्वारीसाठी खरेदी केंद्र

          धारणी आदिवासी विकास महामंडळामार्फत बैरागड, सावलीखेडा, साद्रावाडी, चाकर्दा, हरीसाल, धारणी आणि चिखलदरा तालुक्यात गौलखेडा बाजार व चुरणी ही केंद्रे जाहीर केली आहेत. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी केंद्र प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

 

खरेदी केंद्रांचे संपर्क क्रमांक

धारणी तालुक्यात बैरागड केंद्राचा संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 9405868523 हा आहे. सावलीखेडा केंद्र प्रमुखांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9405318955आहे. साद्रावाडी केंद्र प्रमुखांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9168736531, तसेच चाकर्दा केंद्रप्रमुखांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7350895832 आणि  हरिसाल केंद्र प्रमुखांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8999210859 हा आहे.

धारणी केंद्र प्रमुखांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9420431774, चुरणी केंद्र प्रमुखांचा संपर्क क्रमांक 8788988756 आणि गौलखेडा बाजार केंद्रप्रमुखांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8888010844 हा आहे.

 

 

          नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी खरीप पणन हंगाम 2022-23 मधील पीकपेरा, तलाठ्याच्या सहीशिक्यानिशी ऑनलाईन 7/12, आधारकार्ड, आधार लिंक असलेले बँक खाते क्रमांक, बँक पासबुकसह आवश्यक ती इतर कागदपत्रे सादर करून नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणी करताना शेतकऱ्यांनी जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रशासन सुनील महाजन यांनी केले आहे.

 

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा