गांधीजयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्रातर्फे स्वच्छता मोहिम
अमरावती, दि. 10 : नेहरु युवा केंद्रातर्फे भाग्यश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सहकार्याने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, भाग्यश्री शाळेचे मुख्याध्यापक आर.डी. खरालेकर तसेच आर.एम.भेंडे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांना थोरपुरूषांचे योगदान, जीवनकार्य, आरोग्य संवर्धनासाठी स्वच्छतेचे महत्व आदींबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागाने परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
रेवसा येथे शाहू फुले आंबेडकर बहुद्देशीय सामाजिक संस्थेमार्फतही महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा युवा अधिकारी श्रीमती बासुतकर, उमेश आगरकर, पोलीस पाटील छाया वानखडे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विनोद भगत, संस्थेच्या अध्यक्ष दीपाली भांगे, सचिव सचिन ढोके, साक्षी कैलास केवटी, युवा स्वयंसेवक, सरपंच ,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. यावेळी संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. रक्तदान, कोविड लसीकरणाबाबतही यावेळी जनजागृती करण्यात आली.
०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा