मध्यप्रदेशचे
राज्यपाल मंगूभाई पटेल
यांचे
अमरावतीत आगमन व स्वागत
अमरावती,
दि. 23 : मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचे आज सायंकाळी येथील शासकीय
विश्रामगृह येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी
पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी
यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मध्य प्रदेश
व महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या उपस्थितीत सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक डॉ.
पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधीनी येथील सभाकक्षात उदया,
24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल. या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल उपस्थित राहतील .
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा