आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाकरीता
भाडेतत्वावर इमारतीसाठी प्रस्ताव आमंत्रित
अमरावती, दि.10 : प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत आदिवासी मुलांचे वसतीगृह क्र. 01 करीता 100 विद्यार्थी क्षमतेची इमारत भाडेतत्वावर आवश्यक आहे. इच्छुकांनी इमारत भाडे प्रस्ताव प्रकल्प कार्यालय, धारणी येथे सादर करण्याचे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी poitdp.dharni-mh@gov.in व podharni@gmail.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
भाडेतत्वावरील वसतीगृह इमारत ही भौतीक सोयी-सुविधा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असणे अनिवार्य आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा