मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

रोलर स्केटींग स्पिड इनलाईन स्पर्धेत राज्यात ‘रुचिका वासनिक’ची उत्तुंग भरारी

 




रोलर स्केटींग स्पिड इनलाईन स्पर्धेत

राज्यात ‘रुचिका वासनिक’ची उत्तुंग भरारी

 

अमरावती, दि. 27 : नुकत्याच पार पडलेल्या स्पिड स्केंटीग इनलाईन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने घेण्यात आलेल्या 33 व्या राज्यस्तरीय स्केंटीग स्पिड इनलाईन स्पर्धेत अमरावतीच्या कु. रुचिका मनोज वासनिक हिने दहा किलोमीटर पॉईंट टु पॉईंट प्रकारात सुवर्ण पदक तसेच रोड एकीमेशन व  रिक इलिमेशन प्रकारात काँस्य पदक पटकावून स्केटींग या खेळात अमरावती जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. तीच्या या नावलौकीक यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व खेळाडूंनी भरभरुन कौतुक होत आहे.

मुंबई विरार येथे दि. 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान सपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्केटींग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कु. रुचिका वासनिक हिने 4 ते 17 वर्षे वयोगटात अमरावती डिस्ट्रीक्ट स्केटींग असोशिएशनकडून सहभाग नोंदविला होता.

कु. रुचिका ही आपल्या स्केटींगचा सराव येथील जिल्हा स्टेडियमच्या स्केंटीग रिकवर सायंकाळी 7 ते 8.30 दरम्यान श्याम भोकरे सरांच्या मार्गदर्शनात करीत असते. तीने या आपल्या यशाचे श्रेय असो.चे अध्यक्ष दिलीप खत्री, उपाध्यक्ष रत्नाकर शिरसाट, सचिव श्याम भोकरे, सहसचिव स्वपनिल भोकरे,प्रा. निळकंट चौधरी सर, किशोर बोरकर सौ. भारती हबर्डे, व मनिबाई गुजराती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली देव मॅडम, व सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच क्रीडा उपसंचालक संतान सर जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव सराना व आपल्या आई-वडिलांना दिले. तिचे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून कौतूक होत आहे.

0000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा