मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

अमरावती व बडनेरा शहरातील पाणी पुरवठा 24 नोव्हेंबरला बंद राहणार

                                                अमरावती व बडनेरा शहरातील पाणी पुरवठा

24 नोव्हेंबरला बंद राहणार

             अमरावती, दि. 21 : अमरावती पाणी पुरवठा योजनेंतर्गत सिंभोरा हेडवर्क येथे 990 किलोवॅट सौरउर्जा प्रकल्प जोडणीचे काम करावयाचे असल्याने अमरावती व बडनेरा शहराचा शुक्रवार, दि. 24 नोव्हेंबरला पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

सौरउर्जा प्रकल्प जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर दि. 25 नोव्हेंबरपासून अमरावती व बडनेरा शहरातील पाणी पुरवठा नियमित स्वरुपात सुरु राहील. तरी सर्व भागातील नागरिकांनी यांची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा