सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

इयत्ता दहावीच्या फेब्रु-मार्च 2024 च्या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांना मुदतवाढ

 

इयत्ता दहावीच्या फेब्रु-मार्च 2024 च्या परीक्षेची

ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांना मुदतवाढ

      अमरावती, दि. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी मार्च 2024 परीक्षेस नियमित विद्यार्थ्याची आवेदनपत्रे, पुनर्परीक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate) तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याच्या तारखा तसेच माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने ऑनलाईन सादर करण्याची मुदत नियमित शुल्कासह दि. 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 तर विलंब शुल्कासह दि. 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2023 पर्यंत राहील. माध्यमिक शाळांनी चलन Download करुन शुल्क भरण्याच्या तारीख दि. 23 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2023 राहील, असे अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सहाय्यक सचिव संगीता पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा