सोमवार, ३० डिसेंबर, २०२४
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीएचडीप्राप्त अनिकेत देशमुखचा सत्कार पीएचडी प्राप्त करणारा पहिला अनाथ
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीएचडीप्राप्त अनिकेत देशमुखचा सत्कार
पीएचडी प्राप्त करणारा पहिला अनाथ
अमरावती, दि. 30 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये पीएचडी प्राप्त करणारा अनिकेत वीरेंद्र देशमुख यांचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे श्री. देशमुख हे अमरावती जिल्ह्यातून डॉक्टरेट प्राप्त करणारे पहिले अनाथ विद्यार्थी ठरले आहेत.
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचे अनिकेत वीरेंद्र देशमुख यांनी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट पूर्ण केली आहे. त्यांनी 'कलम 35 ए रद्द करणे : कारणे आणि परिणाम' या विषयावर पीएचडीचा शोध प्रबंध सादर केला आहे. विद्यापीठाने 20 डिसेंबर रोजी अधिसूचना काढून त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे
00000
शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, २६ डिसेंबर : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.
०००
गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४
‘ग्लोबल ॲल्युमनी मीट 2024’ चे थाटात उद्घाटन महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे डॉ. अशोक घाटोळ * माजी विद्यार्थ्यांकडून सव्वा कोटीच्या ‘स्पंदन ऑडीटोरियम’ची निर्मिती
डॉ. अशोक घाटोळ
* माजी विद्यार्थ्यांकडून सव्वा कोटीच्या ‘स्पंदन ऑडीटोरियम’ची निर्मिती
अमरावती, दि. 26 : ज्या महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आपण घडलो. त्या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे माजी कुलगुरु डॉ. अशोक घाटोळ यांनी आज येथे केले.
हिरक महोत्सवी वर्षानिमित्त येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांचा जागतिक मेळाव्याचे (ग्लोबल ॲल्युमनी मीट 2024) आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाविद्यालयाच्या 1964 च्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी संशोधक प्रा. विजय इंगोले, माजी विद्यार्थी सज्जनसिंग चव्हाण (आयएएस), विकास सुरळकर (आयएएस), श्रीमती प्रेरणा देशभ्रतार (आयएएस), हेमंत कोठीकर (आयआरएस), आयआरबी मुंबईचे संचालक अजय देशमुख, जिओ-टीएम फोरमचे वरिष्ठ अधिकारी अनिकेत म्हाला, अस्पा बँड सन्सचे व्यवस्थापकीय संचालक रणजित बंड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किरण पातुरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष महल्ले आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
संस्थेच्या 1990 च्या माजी विद्यार्थ्यांनी सव्वा कोटी रुपयांचे स्पंदन ऑडीटोरियम बांधून संस्थेच्या इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधेत भर टाकून एक आदर्श स्थापित केला, याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे कौतूक केले.
महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. घाटोळ म्हणाले की, संसाधनांची कमतरता असून सुध्दा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली गुणवत्ता व दर्जा टिकून ठेवला आहे. त्यासाठी माझ्यासह, सन 1964 पासून ते आजपर्यंतच्या प्राचार्यांनी विशेष प्रयत्न करुन परिश्रम घेतले आहे. त्यामुळेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास शासनाची स्वायत्तता मिळाली आहे. महाविद्यालयाच्या गुणवान विद्यार्थ्यांमुळे तसेच नवीनतम उपक्रमांमुळे भविष्यात हे महाविद्यालय अभियांत्रिकी विद्यापीठ बनेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीही राज्य, देश व जागतिक पातळीवर महाविद्यालयाचे नाव रोषण केले आहे. त्याचीच प्रचिती म्हणून 1990 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी सव्वा कोटी रुपयांचे सर्व सोयी-सुविधायुक्त स्पंदन ऑडीटोरियम तयार करुन दिले आहे. आज त्या ऑडीटोरियमचे उद्घाटन होत आहे, ही अतिशय गौरवाची बाब आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने महाविद्यालयाला आपले काही देणे आहे, या भावनेतून संस्थेच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. घाटोळे यांनी केले.
जीसीओई संस्थेतून उर्त्तीण होऊन गेलेले अनेक विद्यार्थी विविध कार्यक्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहे. काहीजण आयएएस, आयआरएस तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील नामांकीत कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या आयोजनातून त्यांच्या यशस्वी वाटचालीबाबत विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घ्यावे. माजी विद्यार्थ्यांनी सुध्दा आपल्या महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डिजीटल ग्रंथालय, इमारत बांधकाम, अत्याधुनिक लॅब निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन अन्य निमंत्रित मान्यवरांनी केले. यावेळी मान्यवरांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणी व प्रसंगांना उजाळा देत अभियांत्रिकी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण कसा केला यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी त्यांच्या यशस्वी जडणघडणीत महाविद्यालयाची महत्वपूर्ण भूमिकेसंदर्भात माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन देशसेवा करावी. तसेच आपल्या मातृसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करावी. महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलन्स ची निर्मिती होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्राचार्य श्री. महल्ले यांनी माजी विद्यार्थ्यांकडून संस्थेला अपेक्षित असलेले सहकार्य व मदत याबाबत विस्तृत विवेचन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक वर्ग, माजी विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पुजन, आराधना व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या जडणघडण व यशस्वी वाटचाल यासंबंधी लघु चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या विविध विद्याशाखा, यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा परिचय व उपक्रमाबाबत प्रा. नितीन पाठक यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली.
देश-विदेशातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, माजी प्राध्यापक वर्ग व माजी प्राचार्य आदी ग्लोबल ॲल्युमनी मीट 2024 मध्ये सहभागी होते. आभार प्रदर्शन प्रा. माहेश्वरी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
00000
सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे अनावरण
मुंबई, दि. २६ : राज्याची प्रगती तेथील ‘ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ‘ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी प्राधान्याने काम करीत आहे. नागरिकांना विविध सेवा विनाविलंब मिळतात की नाही, यावरून राज्यातील सुशासन लक्षात येत असते. सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा मार्गही बळकट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक, २०२४ अहवालाचे अनावरण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, कृषि विभागाच्या सचिव जयश्री भोज, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, वित्त विभागाच्या सचिव शैला ए तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक कृष्णा फिरके, सहसंचालक सविता दिक्षीत आदी उपस्थित होते. दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे केंद्र शासनाच्या प्रशासनिक सुधारणा व नागरिकांच्या तक्रारी विभागाचे सचिव यु. श्रीनिवास यांनीही संबोधीत केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या सहकार्याने जिल्हा सुशासन निर्देशांक हा विविध क्षेत्रांच्या मापदंडानुसार सुशासनाची व्याप्ती दर्शविते. अतिशय विस्तृत अशाप्रकारचा हा निर्देशांक आहे. मागील काळात शासनाने लोककेंद्रीत प्रशासनावर भर देत नागरिकांना तक्रारी सोडविण्यासाठी आपले सरकार नावाचे पोर्टल उपलब्ध करून दिले. जिल्हा सुशासन निर्देशांक ही पद्धत केवळ रॅकिंग दाखविणारी नाही, तर सुधारणा करण्यास वाव देणारी आहे. राज्यात जास्तीत जास्त गुण मिळणारे जिल्हे आणि कमी गुण मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गुणांचा फरक कमी आहे. त्यामुळे सर्वच जिल्हे प्रगती करताना दिसत आहेत.
जिल्हा सुशासन निर्देशांक हा १० विकास क्षेत्रातील १६१ मापदंडांवर आधारित असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निर्देशांकात चांगली कामगिरी केलेल्या जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच ज्या जिल्ह्यांची कामगिरी गुणवत्तेच्या आधारे उंचावणे गरजेचे आहे. त्या जिल्ह्यांनी कामगिरी सुधारत निर्देशांकात प्रगती करावी, यामध्ये पालक सचिवांनी लक्ष घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा सुशासन निर्देशांकात क्षेत्रानुसार क्रमानुसार पहिले पाच जिल्हे
कृषी व संबंधित क्षेत्र : अमरावती, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी. वाणिज्य व उद्योग : मुंबई शहर, रायगड, पुणे, पालघर, ठाणे. मनुष्यबळ विकास : नाशिक, गोंदीया, पुणे, यवतमाळ, सातारा. सार्वजनिक आरोग्य : सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, पालघर, बीड, रत्नागिरी. पायाभूत सोयी - सुविधा : लातूर, नाशिक, बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली. सामाजिक विकास : गोंदिया, अमरावती, नाशिक, धुळे, नागपूर. आर्थिक सुशासन : मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, जळगांव, भंडारा. न्यायप्रणाली व सुरक्षा : मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, गडचिरोली, रायगड. पर्यावरण : सांगली, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर. लोककेंद्रीत प्रशासन : नाशिक, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती.
शनिवार, २१ डिसेंबर, २०२४
राज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर
राज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर
मुंबई, दि.22 : - राज्य मंत्रिमंडळांचे खातेवाटप 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचे खाते वाटप पुढील प्रमाणे-
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.
उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)
उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.
मंत्री
श्री. चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
श्री. राधाकृष्ण विखे - पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
श्री. हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
श्री. चंद्रकांत(दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य
श्री. गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.
श्री. गणेश नाईक : वने
श्री. गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता.
श्री. दादाजी भुसे: शालेय शिक्षण.
श्री. संजय राठोड : मृद व जलसंधारण.
श्री. धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.
श्री. मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता.
श्री. उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा
श्री. जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार.
श्रीमती पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.
श्री. अतुल सावे : इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक उर्जा
श्री. अशोक उईके : आदिवासी विकास.
श्री. शंभूराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.
अॅड.आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.
श्री. दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
कु. आदिती तटकरे : महिला व बालविकास.
श्री. शिवेंद्रसिंह भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).
अॅड. माणिकराव कोकाटे : कृषी.
श्री. जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायतराज.
श्री. नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य.
श्री. संजय सावकारे : वस्त्रोद्योग.
श्री. संजय शिरसाट : सामाजिक न्याय.
श्री. प्रताप सरनाईक : परिवहन
श्री. भरत गोगावले : रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास.
श्री. मकरंद जाधव-(पाटील): मदत व पुनर्वसन.
श्री. नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे.
श्री. आकाश फुंडकर : कामगार.
श्री. बाबासाहेब पाटील : सहकार.
श्री. प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.
राज्यमंत्री
अॅड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार,
श्रीमती माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
डॉ पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.
श्रीमती मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).
श्री. इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण.
श्री. योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.
0000
गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४
जी. डी. सी ॲन्ड अे परीक्षा 2024 चा निकाल घोषीत
जी. डी. सी ॲन्ड अे परीक्षा 2024 चा निकाल घोषीत
अमरावती दि. 19 :- सहकार विभागामार्फत घेण्यात आलेली शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या सभेमध्ये माहे मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या जी. डी. सी. ॲन्ड अे व सी. एच. एम. परिक्षा 2024 चा निकाल घोषित करण्यात आलेला आहे.
सदर निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परिक्षार्थ्यांना लॉगइन व पासवर्ड वापरुन पाहता येईल. तसेच पी.डी. एफ. मध्ये https://sahakarayuKta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्वाचे दुवे मधील जी. डी. सी. ॲन्ड ए मंडळ येथे पहावयास उपलब्ध राहील.
फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थीना दि. 4 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 (रात्री 10.30) पर्यत https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर परिक्षार्थ्यांना लॉगइन व पासवर्ड वापर करुन अर्ज करता येईल. फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थी यांनी फेरगुण मोजणी शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी फी रु. 75, अधिक बँक चार्जेस याप्रमाणे चलनद्वारे भरावे, बँकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत दि. 5 जानेवारी 2025 रात्री 10.30 पर्यत राहील. सदर चलन बँकेत दि.5 डिसेंबर 2024 ते 8 जानेवारी 2025 पर्यत (बँकेचे कामकाजाच्या वेळेत) या कालावधीत भरणा करावे, विहीत तारखे नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सहकार संकुल, कांता नगर अमरावती व दुरध्वनी क्र. 072-2661633 व मोबाईल क्रमांक 9421819335 ई- मेल ddrrediffmail.com असा आहे. असे अमरावतीचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, शंकर कुंभार यांनी कळविले आहे.
.
तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही • विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड • एकत्रित मिशन समृध्द महाराष्ट्र
तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
• विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड
• एकत्रित मिशन समृध्द महाराष्ट्र
नागपूर, दि. १९ : महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केले. मागील अडीच वर्षात विक्रमी कामे झाली. एकही दिवस सुटी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला.
अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे वचन
मागील अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यामुळेच आमचे सरकार हे जनतेचे लाडकं सरकार झाले. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही देतोय. मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझे धोरण गतिमान विकास हेच होते तिथे पक्षभेद, द्वेषाला कधी थारा दिला नाही.
विकासकामांचा स्ट्राईक रेट वाढतच राहणार
मागील अडीच वर्षात महायुती सरकारच्या विकासकामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. यापुढे हा स्ट्राईक रेट वाढतच राहणार आहे. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्यासाठी आम्ही सगळे दिवस-रात्र चोवीस तास काम करत होतोच यापुढेही करू अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
विदर्भ विकासासाठी ठोस पावले
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, माझे विदर्भाशी माझे वेगळे नाते आहे ते इथल्या प्रेम करणाऱ्या जनतेमुळे. मुख्यमंत्री असतांना मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली याचा निश्चितच आनंद आहे. मागील दोन्हीही अधिवेशनात आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पाऊलं उचलली आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. समृध्दी महामार्ग आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत. विदर्भातल्या ५ लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी १५ हजार रुपये बोनसची घोषणा मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच अधिवेशनात मी केली होती. या बोनसची रक्कम आम्ही २० हजार केली आहे. विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करायचा आहे.
विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प माझ्या कार्यकाळात सुरू झाले. मागील अडीच वर्षात आम्ही ८६ कॅबिनेट बैठका घेतल्या आणि ८५० महत्त्वाचे निर्णय घेतले. छोटे मोठे निर्णय सांगायला बसले तर एक अधिवेशन कमी पडेल, असेही ते म्हणाले.
अग्रेसर महाराष्ट्र...
मागील अडीच वर्षात ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या. विक्रमी विकासकामे झाली. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला आहे, महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे, जीएसटीत पहिले आहोत, उद्योगांमध्ये पहिला क्रमांक, पाच लाखांचा आरोग्य विमा देणारे पहिले राज्य, शेतकऱ्यांना मोफत वीज देणारे पहिले राज्य, १० लाख तरुणांना स्टायपेंड देणारे पहिले राज्य, देशातला सर्वाधिक लांबीचा सागरीसेतू करणारे पहिले राज्य आणि सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असलेले राज्य, अशी महाराष्ट्राची देशभरात ओळख झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची काम
महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत. महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत साडेचारशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग सुरु करणार आहोत. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोर ही कामे वेगाने सुरु आहेत. सात हजार किमी अॅक्सेस कंट्रोल रस्ते आपण तयार करत आहेत. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असे आमचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात १४०० कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली. ८९ लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देत आहोत. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत ३४ हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झालाय. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून १२३ कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर ९ शहरांतून तीर्थयात्रा सुरु झाली आहे. ६ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखलेला आहे. त्या दिशेनेच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचे राज्य करायचे आहे. विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. प्रधानमंत्र्यांसह गृहमंत्री अमित शाह यांचे भक्कम पाठबळ आहे आणि यापुढेही राहिल याची मला खात्री आहे. आता आमचे एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचे. आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
००००
विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड
विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड
नागपूर, दि. 19 : विधानपरिषदेच्या 19 व्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रा. राम शिंदे यांना सभापतीच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेवून गेले.
विधानपरिषदेच्या सभापतीपदी विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्य श्रीकांत भारतीय, उमा खापरे व शिवाजीराव गर्जे यांनी मांडला. त्यास सदस्य मनीषा कायंदे, सदस्य अमोल मिटकरी व सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रा. राम शिंदे यांचा परिचय करून दिला.
सभापती प्रा. राम शिंदे यांचा परिचय
आमदार प्रा राम शंकर शिंदे
विधानपरिषद सदस्य, माजी मंत्री
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज.
वैयक्तिक परिचय
नाव - प्रा. राम शंकर शिंदे
जन्मतारीख - 1 जानेवारी 1967
शिक्षण – एम. एस्सी, बी.एड.
(वनस्पतिशास्त्र शरीरशास्त्र)
पत्ता - मु.पो. चौंडी, ता. जामखेड,
जि.अहिल्यानगर - 413205
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ
— प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य-2004 ते 2006
— तालुकाध्यक्ष, भाजपा जामखेड तालुका-2006 ते 2009
— जिल्हाध्यक्ष, भाजपा, अहिल्यानगर 2010 ते 2012
— सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र राज्य 2013 ते 2015
— प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र राज्य-2021
— सदस्य, भाजपा, कोअर कमिटी, महाराष्ट्र राज्य-2022
लोकप्रतिनिधी आणि कार्यकाळ-
— सन 2000-2005 - सरपंच, ग्रामपंचायत चौंडी
— सन 2009-2014 - आमदार
227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 12,500 मतांनी विजयी.
— 2014-2019 आमदार
-227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 38,000 मतांनी विजयी.
— सन 2014-2016 या दरम्यान गृह, कृषी, आरोग्य व पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले.
सन 2016-2019 या दरम्यान जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, वस्रोद्योग व पणन या विभागाचे कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले.
(सन 2016 ते 2019 या दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला " जलयुक्त शिवार अभियान " हे जलसंधारण विभागांतर्गत प्रा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबवण्यात आले.)
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधान परिषदेत ठराव
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधान परिषदेत ठराव
नागपूर, दि. 19 : पुणे येथील लोहगाव विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला.
या ठरावाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधान परिषद नियम 106 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
नागपूर, दि. 19 : पुणे येथील लोहगाव विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला.
या ठरावाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधान परिषद नियम 106 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस - विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे सभापतीपदी निवडीबद्दल विधानपरिषदेत प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन
सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस
- विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे
सभापतीपदी निवडीबद्दल विधानपरिषदेत प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन
नागपूर, दि. 19 : विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून विधानपरिषदेला वेगळी परंपरा आहे. या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस आहे. सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण लोकहितासाठी खर्ची पडेल असे जबाबदारीपूर्ण वर्तन आपले राहिल, अशी काळजी घेऊया, अशा शब्दांत विधानपरिषदेचे नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.
विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाल्यानंतर अभिनंदनपर प्रस्तावावर प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री पंकजा मुंडे, सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, ॲड. अनिल परब यांनी निवडीवर भावना व्यक्त केल्या.
सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, जनतेच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण उपयोगात आणायचा आहे. सत्ताधारी आणि विरोधी ही संसदीय लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत आणि त्या रथात जनताजनार्दनाची अभिव्यक्ती विराजमान आहे. या रथाला विकासाच्या दिशेने नेवू. सदस्यांचा सभागृह कामकाजातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सभागृहात बसलेले असताना समाजाचा कुठला प्रश्न नेमक्या आयुधामार्फत मांडून आपण जनतेला न्याय देऊ शकू यादृष्टीने सतत तयारी केली पाहिजे. आपले सभागृह ज्येष्ठांचे सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते मात्र अलिकडच्या काळात तरूण सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ते वयोमानपरत्वे तरूण होत चालले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विधीमंडळाचे कामकाज प्रभावी होण्यासाठी चतु:सूत्रीचा कार्यक्रम अंमलात आणणार आहे. यामध्ये प्रश्नोत्तराचा तास महत्त्वाचा असून हा तास विनाव्यत्यय पार पडावा. समित्यांचे गठन, समिती प्रमुखांना उचित मार्गदर्शन, सभागृहाला अहवाल सादर होणे ही कार्यपध्दती आणखी गतिमान आणि मजबूत करण्यात येईल.कायदा निर्मिती प्रक्रियेत सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा. तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा आणि मागण्यांवरील चर्चा यांना पुरेसा अवधी मिळणे, सदस्यांना आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मार्गदर्शन आणि निधी मिळणे यादृष्टीने आपण उत्तम कार्य करणे या चतु:सूत्रीचा अवलंब कामकाजात करणार आहे, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
माजी सभापती ना.स. फरांदे यांच्या विचाराचा वारसा चालवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे हे शिक्षक आहेत. त्यामुळे ते सभागृहाचे कामकाज अतिशय शिस्तीने व संवेदनशीलपणे चालवतील. शिक्षक हा जन्मभर शिक्षक असतो. तो शिकतही असतो. त्यामुळे प्रा. शिंदे पदावर आल्यावर अनेक चांगले पायंडे पाडतील व पिठासीन अधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील असा विश्वास आहे.
माजी सभापती प्रा. ना.स. फरांदे यांच्या विचारांचा वारसा त्यांच्याच अहिल्यानगर जिल्ह्याचे असलेले प्रा. शिंदे पुढे नेतील. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षात त्यांचे वंशज असलेले प्रा. राम शिंदे हे विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या वरिष्ठ पदावर बसत आहेत, हे एक प्रकारे पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना वाहिलेली सुमनांजली आहे. सरपंच पदापासून ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रा. शिंदे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवाचा फायदा त्यांना सभागृह चालविताना नक्कीच उपयोगी येईल. ऐतिहासिक चौंडी गावच्या सरपंचपदी असताना त्यांनी केलेले काम राज्यात नावजले गेले. त्याचबरोबर अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांचा प्रभाव आहे. दोन्ही सभागृहाच्या पिठासीन अधिकाऱ्यांमध्ये विधानपरिषदेच्या सभापती पदाचा मान मोठा आहे. अतिशय संवेदनशील व्यक्ती ही पदावर बसली आहे. एक उत्तम सभापती म्हणून सभागृहात त्यांचे नाव घेतले जाईल. यामाध्यमातून राज्याच्या 14 कोटी जनतेला न्याय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा प्रा.शिंदे चालवतील - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षात प्रा. राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाली ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या नावात राम आहे, त्यामुळेच ते रामासारखेच न्याय प्रिय असतील. सत्ताधारी किंवा विरोधक कुणावरही ते अन्याय होवू देणार नाहीत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायाचे राज्य कसे असावे, प्रजेचे कल्याण कसे करावे याचा वस्तुपाठ घालून दिला. प्रा. शिंदे हे हेच संस्कार घेऊन समाजकारणात उतरले आहेत. त्यांची सभापतीपदी निवड ही सर्वार्थांने अचूक आहे. सभापती म्हणून त्यांच्यातीलं नेतृत्व, संयम, अभ्यासू वृत्ती आणि सभागृह चालविण्याची हातोटी हे गुण दिसतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रा. शिंदे यांनी राज्यमंत्री व नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले. शांत संयमी नेतृत्व म्हणून प्रा. शिंदे यांनी ओळख आहे. मात्र, ते जनतेच्या प्रश्नांवर कायम आक्रमक असतात, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सभापतीपदाला न्याय देऊन गौरव वाढवतील - उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीचे आसन अत्यंत मानाचे, सन्मानाचे व तितकेच जबाबदारीचे आहे. अनेक नेत्यांनी हे पद भूषविले आहे. प्रा. शिंदेही या पदाला योग्य न्याय देऊन पदाचा गौरव वाढवतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची न्यायप्रियता, त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा, विचारांचा वारसा खऱ्या अर्थान पुढे नेण्याचा, राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनात चांगला बदल घडवून आणण्याचे कार्य या सभापतीपदाच्या माध्यमातून प्रा. शिंदे करतील असा विश्वास आहे.
शेती-मातीत, गाव-खेड्यात वाढलेला एका शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा मुलगा आज विधीमंडळाच्या सर्वोच्च साभागृहाच्या प्रमुखपदी बसला आहे. हे खऱ्या अर्थान लोकशाहीचे मोठेपण आहे, सौंदर्य आहे. आपल्या देशाच्या संविधानाची महानता, सुंदरता आहे. प्रा. शिंदे यांच्या रुपानं विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती तरुण आहेत. अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद सांभळले आहे. त्यामुळे प्रा. शिंदे यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रा. शिंदे हे त्यांच्या प्रगल्भ आणि संयमी नेतृत्वामुळे या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडतील. प्रा. शिंदे यांनी सभापतीपदाचा उपयोग करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या त्यांच्या कार्यकाळाला नवा आयाम द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वरिष्ठ सभागृहाची परंपरा जपताना योग्य सहकार्य करू – अंबादास दानवे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी वर्षात प्रा. शिंदे यांना मिळालेला मान बहुमूल्य आहे. प्रा. शिंदे यांनी संघर्ष करत इथपर्यंतचा प्रवास केला आहे. मंत्री असताना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. आताही ते चांगले काम करतील. वरिष्ठ सभागृहाची परंपरा जपत असताना त्यांना विरोधी पक्षाकडून योग्य सहकार्य मिळेल.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मागण
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करावे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई, दि. 19 : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे.
श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे.
राज्यातील आमदार सर्वश्री नितीन पवार, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, सरोजताई अहिरे आदी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याप्रश्नी लक्ष घालून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. या लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री श्री. गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांना लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात की, राज्यात विशेष करुन नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांकडून परदेशात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केली जाते. आजमितीस उन्हाळी कांदा संपलेला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत कांद्याचे उत्पादन घेतले आहे. अवेळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार त्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उर्वरीत चांगल्या कांद्यास खर्चावर आधारीत चांगला भाव मिळणे गरजेचे असतांना बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2400 रुपये अत्यल्प दर मिळत आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 20 टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. जेणेकरून लांल कांद्याचे दर टिकुन राहतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत चांगले दर मिळतील, असे उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय व्यापार मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले असून 20 टक्के निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.
आश्वासने पूर्ण होणार; योजना बंद होणार नाहीत ...महाराष्ट्र आता थांबणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींचा देय हप्ता अधिवेशनानंतर जमा होणार, शेतकऱ्यांना वीज बिल नाही
आश्वासने पूर्ण होणार; योजना बंद होणार नाहीत
...महाराष्ट्र आता थांबणार नाही
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींचा देय हप्ता अधिवेशनानंतर जमा होणार, शेतकऱ्यांना वीज बिल नाही
नागपूर, दि. 19 :- राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून 3 लाख 48 हजार 70 कोटींची गुंतवणूक आली असून यामुळे 2 लाख 13 हजार 267 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात 10 मोठ्या प्रकल्पांना मंजूरी दिली असून यामध्ये 2 लाख 39 हजार 117 कोटींची गुंतवणूक तर 79 हजार 720 इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विदर्भातील 47 मोठ्या प्रकल्पात 1 लाख 23 हजार 931 कोटींची गुंतवणूक होऊन 61 हजार रोजगार निर्मिती, मराठवाड्यात 38 प्रकल्पात 74 हजार 646 कोटी गुंतवणूक व 41 हजार 325 रोजगार निर्मिती आणि उर्वरित महाराष्ट्रात 136 प्रकल्पात 1 लाख 49 हजार 493 कोटींची गुंतवणूक होऊन 1 लाख 10 हजार 588 रोजगार निर्मिती होत आहे. यामुळे महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी देखील उद्योगाचे जाळे विकसित होत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा संविधानानुसार दिला. यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी निधी मिळणार आहे. तसेच विद्वानांना दोन पुरस्कार मिळणार आहेत. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नांसह आपण आपली भाषा रूजविणार आहोत. न्यायालयातील निवाडे मराठीत उपलब्ध करण्यास सुरूवात होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी गेल्या अडीच वर्षात 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे 25.21 लक्ष हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला असून नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प यासाठी उपयुक्त आहे. वैनगंगा-नळगंगा, नारपार-गिरणा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे असे नदी जोडप्रकल्प मार्गी लावणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीजोड प्रकल्प महत्वाचे आहेत. यासाठी राज्य शासनाने जल आराखडा तयार केला आहे. राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत असून यामुळे ही शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मेट्रो प्रकल्प गतीमान
मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये मेट्रोच्या कामाला अधिक गती देण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. मुंबईत मेट्रो टप्पा 3 चे काम अंतिम टप्प्यात असून बीकेसी ते कुलाबा ही नवीन लाईफ लाईन होणार आहे. 17 लाख प्रवाशी प्रवास करणार आहेत. मे २०२५ पर्यंत ही लाईन खुली होईल.
शेतकऱ्यांकडून वीज बील घेणार नाही
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही. ९ लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आम्ही देणार असून ३ महिन्यात जोडणी देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2030 साली राज्यात 52 टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल असेही त्यांनी सांगितले.
वाढवण बंदर विकासाचे केंद्र
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पालघर येथे 76 हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर उभारण्यात येत आहे. हे बंदर जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठं असून या बंदरामुळे अनेक फायदे होणार आहेत.
नाशिक येथे आय टी पार्क
नाशिक येथे आय टी पार्क विकसित करण्यात येणार असून या कामासाठी वास्तू विषारदाची नेमणूक झाली आहे. लवकरच येथे अद्ययावत आयटी पार्क निर्माण केले जाईल.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची दिशा आणि दृष्टीकोन स्पष्ट करताना पुढील ओळीतून आपली भूमिका मांडली...
या ओळी पुढीलप्रमाणे...
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...
उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात, बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ, तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...
रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...
विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल, मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल, मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...
जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन, राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...
पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार, आनंदाचा शिधा देईल आधार, उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...
लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान, ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही, अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही...
असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ, कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
००००
विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड
विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड
नागपूर, दि. 19 : विधानपरिषदेच्या 19 व्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रा. राम शिंदे यांना सभापतीच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेवून गेले.
विधानपरिषदेच्या सभापतीपदी विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्य श्रीकांत भारतीय, उमा खापरे व शिवाजीराव गर्जे यांनी मांडला. त्यास सदस्य मनीषा कायंदे, सदस्य अमोल मिटकरी व सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रा. राम शिंदे यांचा परिचय करून दिला.
सभापती प्रा. राम शिंदे यांचा परिचय
आमदार प्रा राम शंकर शिंदे
विधानपरिषद सदस्य, माजी मंत्री
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज.
वैयक्तिक परिचय
नाव - प्रा. राम शंकर शिंदे
जन्मतारीख - 1 जानेवारी 1967
शिक्षण – एम. एस्सी, बी.एड.
(वनस्पतिशास्त्र शरीरशास्त्र)
पत्ता - मु.पो. चौंडी, ता. जामखेड,
जि.अहिल्यानगर - 413205
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ
— प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य-2004 ते 2006
— तालुकाध्यक्ष, भाजपा जामखेड तालुका-2006 ते 2009
— जिल्हाध्यक्ष, भाजपा, अहिल्यानगर 2010 ते 2012
— सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र राज्य 2013 ते 2015
— प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र राज्य-2021
— सदस्य, भाजपा, कोअर कमिटी, महाराष्ट्र राज्य-2022
लोकप्रतिनिधी आणि कार्यकाळ-
— सन 2000-2005 - सरपंच, ग्रामपंचायत चौंडी
— सन 2009-2014 - आमदार
227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 12,500 मतांनी विजयी.
— 2014-2019 आमदार
-227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 38,000 मतांनी विजयी.
— सन 2014-2016 या दरम्यान गृह, कृषी, आरोग्य व पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले.
सन 2016-2019 या दरम्यान जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, वस्रोद्योग व पणन या विभागाचे कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले.
(सन 2016 ते 2019 या दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला " जलयुक्त शिवार अभियान " हे जलसंधारण विभागांतर्गत प्रा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबवण्यात आले.)
तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही • विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड • एकत्रित मिशन समृध्द महाराष्ट्र
तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
• विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड
• एकत्रित मिशन समृध्द महाराष्ट्र
नागपूर, दि. १९ : महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केले. मागील अडीच वर्षात विक्रमी कामे झाली. एकही दिवस सुटी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला.
अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे वचन
मागील अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यामुळेच आमचे सरकार हे जनतेचे लाडकं सरकार झाले. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही देतोय. मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझे धोरण गतिमान विकास हेच होते तिथे पक्षभेद, द्वेषाला कधी थारा दिला नाही.
विकासकामांचा स्ट्राईक रेट वाढतच राहणार
मागील अडीच वर्षात महायुती सरकारच्या विकासकामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. यापुढे हा स्ट्राईक रेट वाढतच राहणार आहे. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्यासाठी आम्ही सगळे दिवस-रात्र चोवीस तास काम करत होतोच यापुढेही करू अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
विदर्भ विकासासाठी ठोस पावले
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, माझे विदर्भाशी माझे वेगळे नाते आहे ते इथल्या प्रेम करणाऱ्या जनतेमुळे. मुख्यमंत्री असतांना मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली याचा निश्चितच आनंद आहे. मागील दोन्हीही अधिवेशनात आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पाऊलं उचलली आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. समृध्दी महामार्ग आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत. विदर्भातल्या ५ लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी १५ हजार रुपये बोनसची घोषणा मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच अधिवेशनात मी केली होती. या बोनसची रक्कम आम्ही २० हजार केली आहे. विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करायचा आहे.
विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प माझ्या कार्यकाळात सुरू झाले. मागील अडीच वर्षात आम्ही ८६ कॅबिनेट बैठका घेतल्या आणि ८५० महत्त्वाचे निर्णय घेतले. छोटे मोठे निर्णय सांगायला बसले तर एक अधिवेशन कमी पडेल, असेही ते म्हणाले.
अग्रेसर महाराष्ट्र...
मागील अडीच वर्षात ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या. विक्रमी विकासकामे झाली. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला आहे, महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे, जीएसटीत पहिले आहोत, उद्योगांमध्ये पहिला क्रमांक, पाच लाखांचा आरोग्य विमा देणारे पहिले राज्य, शेतकऱ्यांना मोफत वीज देणारे पहिले राज्य, १० लाख तरुणांना स्टायपेंड देणारे पहिले राज्य, देशातला सर्वाधिक लांबीचा सागरीसेतू करणारे पहिले राज्य आणि सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असलेले राज्य, अशी महाराष्ट्राची देशभरात ओळख झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची काम
महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत. महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत साडेचारशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग सुरु करणार आहोत. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोर ही कामे वेगाने सुरु आहेत. सात हजार किमी अॅक्सेस कंट्रोल रस्ते आपण तयार करत आहेत. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असे आमचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात १४०० कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली. ८९ लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देत आहोत. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत ३४ हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झालाय. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून १२३ कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर ९ शहरांतून तीर्थयात्रा सुरु झाली आहे. ६ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखलेला आहे. त्या दिशेनेच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचे राज्य करायचे आहे. विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. प्रधानमंत्र्यांसह गृहमंत्री अमित शाह यांचे भक्कम पाठबळ आहे आणि यापुढेही राहिल याची मला खात्री आहे. आता आमचे एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचे. आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
००००
अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान
अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक
- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान
आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त
नागपूर,दि. 19 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरीत्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर - अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.
श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रिम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.
००००००
बुधवार, १८ डिसेंबर, २०२४
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू ११ जानेवारी, २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू
११ जानेवारी, २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई दि.18: भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता दि.23 डिसेंबर, 2024 ते 11 जानेवारी, 2025 या कालावधीत प्रवेश अर्ज ऑनलाइन स्वरूपात करावे, असे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ग. ल. तरतरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अर्ज करण्यासाठी www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://doaonline. Co.in/LDMIC/ या लिंकवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
संगीत महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांची गुणवत्ता व उपयुक्तता उत्कृष्ट दर्जाची राखण्यासाठी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या सल्लागार मंडळावरती अध्यक्ष म्हणून उषा मंगेशकर, सदस्य म्हणून सुरेश वाडकर, आदिनाथ मंगेशकर तर मयुरेश पै समन्वयक म्हणून आणि कला संचालनालयाचे संचालक संतोष क्षीरसागर सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
महाविद्यालयात शिकवण्यात येणारे अभ्यासक्रम
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन , सतार वादन, पियानो/कीबोर्ड प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच संगीत निर्मिती व ध्वनी अभियांत्रिकी प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी 25 प्रवेश क्षमता आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष असून वार्षिक शुल्क 5400 रुपये इतके आहे. तसेच सलिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिने कालावधीसाठी शनिवार - रविवार या दिवशी भावसंगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे या अभ्यासक्रमासाठी 50 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून वीस हजार रुपये प्रवेश शुल्क असणार आहे.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तात्पुरत्या स्वरूपात पु. ल.देशपांडे अकादमी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी मुंबई येथे फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात येतील. प्रवेश प्रक्रिया तसेच ऑडिशन बाबत पुढील माहिती www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याने उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळाला भेट द्यावी असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000
विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून सदस्य चैनसुख संचेती यांची नियुक्ती जाहीर
विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून
सदस्य चैनसुख संचेती यांची नियुक्ती जाहीर
नागपूर, दि. १८ : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा कामकाजासाठी सदस्य चैनसुख संचेती यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण
नागपूर, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच अन्य विविध विभागांचे अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव तसेच गृह विभाग, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हे नवीन संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी सुलभ करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विविध जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क (ऑनलाईन सेवा), आपले सरकार, महाराष्ट्र राज्य पोलीस, बृहन्मुंबई पोलीस,महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र शासन, मोटार वाहन विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो, पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर) पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, महाराष्ट्र सुरक्षा दल, मुंबई वाहतूक पोलीस, एनजेडीजी | राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड, देशाच्या सेवेत भारतीय पोलीस, राष्ट्रीय तुरुंग माहिती पोर्टल, ई-प्रोसिक्युशन आदी विभागांचे जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जीएसटी’ परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधीत्व ‘जीएसटी’ बाबत अधिकाऱ्यांकडून घेतला सविस्तर आढावा
‘जीएसटी’ परिषदेत मंत्री आदिती तटकरे करणार राज्याचे प्रतिनिधीत्व
‘जीएसटी’ बाबत अधिकाऱ्यांकडून घेतला सविस्तर आढावा
नागपूर, दि. 18 : राजस्थानमधील जैसलमेर येथे होणाऱ्या डिसेंबर 2024 च्या जीएसटी परिषदेमध्ये मंत्री आदिती तटकरे या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री कु.तटकरे यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांकडून जीएसटीबाबत सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीस राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, विक्रीकर सह आयुक्त किरण शिंदे, विक्रीकर उपायुक्त नंदकुमार दिघे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी यापूर्वी झालेल्या ‘जीएसटी’ परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याने सुचविलेल्या सुधारणा, नव्याने सुचवावयाच्या सुधारणा, करांमध्ये विविध उद्योग, घटक यांना द्यावयाची सूट तसेच कररचनेमध्ये सुलभता आणि करदात्यांच्या व्याख्या सुस्पष्ट असण्याबाबतची माहिती घेतली. इलेक्ट्रीक वाहने, विमा हप्ते, कृषी उत्पादने यासारख्या क्षेत्रांना करांमध्ये सूट देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच काही क्षेत्रांमध्ये करावयाची करकपात आणि करवाढ, त्यामुळे महसुलामध्ये येणारा फरक याची माहितीही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी घेतली.
जैसलमेर येथे दि. 20 व 21 डिसेंबर 2024 असे दोन दिवस ही जीएसटी परिषद होणार आहे. तसेच या परिषदेवेळी अर्थसंकल्पाविषयीही बैठक होणार आहे. यामध्ये राज्यांच्या अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षांची चर्चा करण्यात येणार आहे. याविषयीही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग देण्याचे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
नागपूर, दि. 18 : मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून
ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचे अभिनंदन
समीक्षा क्षेत्रातील व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान
नागपूर, दि. 18 : साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे मराठी समीक्षा क्षेत्रातील एका व्रतस्थ साहित्यिकाचा सन्मान होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय साहित्य संस्थेच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात डॉ रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ रसाळ यांचे मराठी साहित्य विश्वातील योगदान अमुल्य असे आहे. मराठी भाषेचे अध्यापन, संशोधन, संपादन आणि समीक्षा असा त्यांचा चौफेर विहार राहीला आहे. विशेषतः त्यांचे मराठी काव्यविषयक संशोधनात्मक लेखन मौलिक असे आहे. समीक्षेतून कठीण विषय सहज-सुलभपणे समजावून देणारी त्यांची शैली नवोदितांना आश्वासक वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे. मराठी भाषा जतन, संवर्धन तसेच साहित्य विषयक चळवळीतील संस्था, समित्यांवरही डॉ रसाळ सक्रीयपणे कार्यरत आहेत. त्यांच्या समीक्षात्मक लेखनाला राष्ट्रीयस्तरावर मिळालेली ही दाद नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. रसाळ आजही तितक्याच तडफेने लेखन, संशोधनात कार्यरत आहेत. त्यांच्या हातून यापुढेही मराठी साहित्याची अशीच अखंडित सेवा घडत राहो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छांसह मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. रसाळ यांचे अभिनंदन केले आहे.
००००
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या पुढाकाराने जिल्ह्यात कुरण लागवडीचे उद्दिष्ट
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या
पुढाकाराने जिल्ह्यात कुरण लागवडीचे उद्दिष्ट
अमरावती दि. 18 :- सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या पुढाकाराने सार्वजनिक ई- क्लास जमिनीवर तोंगलाबाद ता. दर्यापूर येथे मनरेगा अंतर्गत कुरण लागवड करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अमरावती जिल्ह्यास कुरण लागवडीचे प्रती तालुक्यास 1 हेक्टर या प्रमाणात उद्दिष्ट स्व. वंसतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व संबंधित आधिकारी व कर्मचारी यांना सुचना देण्यात आल्या, शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत संभाव्य दुष्काळ परिस्थितीत चारा टंचाईवर उपाययोजना म्हणून गायरान, वैयक्तीक जमिनीवरकुरण लागवडाला मान्यता प्रदान केली आहे.
कुरण लागवडीच्या अनुषंगाने तालुकास्तरीय यंत्रणांचा आढावा घेण्यात येत असून कुरण लागवडीचा लाभ जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये गावाची निवड करण्यात आली. तोंगलाबाद गावातील बंगाली बाभळी असणाऱ्या ई क्लास, गायरान जमिनीची साफसफाई करुन तेथे मग्रारोहयो अंतर्गत गावातील लोकांच्या सहभागातून 2 हेक्टर क्षेत्रावर नेपीअर चारा गवताची लागवड करण्यात आली. गावातील लोकांच्या सहभागातून सद्यस्थितीत नेपीअर चारा पिकाचे चांगल्या प्रकारे संगोपन करण्यात येत असून साधारणता 2 फूट पर्यंत वाढ झालेली आहे. अंदाजे 30 दिवसानंतर चारा पिक कापणीस तयार होणार असून गावातील पशुधारक शेतकऱ्यास निशुल्क वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे गावात असणाऱ्या 294 जनावरांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, तोंगलाबाद गावातील संरपच वैशाली निरंजन पानझाडे, उपसरपंच सुभाष जउळकार, ग्रामसेवक चंद्रकांत भटकर, ग्राम रोजगार सेवक सोपान जउळकार यांचे प्रयत्नामुळे कुरण लागवड अत्यंत दर्जेदार झालेली आहे. अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी दिली आहे.
000000
विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून सदस्य चैनसुख संचेती यांची नियुक्ती जाहीर
विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून
सदस्य चैनसुख संचेती यांची नियुक्ती जाहीर
नागपूर, दि. १८ : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा कामकाजासाठी सदस्य चैनसुख संचेती यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण
नागपूर, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच अन्य विविध विभागांचे अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव तसेच गृह विभाग, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हे नवीन संकेतस्थळ वापरकर्त्यासाठी सुलभ करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विविध जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क (ऑनलाईन सेवा), आपले सरकार, महाराष्ट्र राज्य पोलीस, बृहन्मुंबई पोलीस,महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र शासन, मोटार वाहन विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो, पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर) पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, महाराष्ट्र सुरक्षा दल, मुंबई वाहतूक पोलीस, एनजेडीजी | राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड, देशाच्या सेवेत भारतीय पोलीस, राष्ट्रीय तुरुंग माहिती पोर्टल, ई-प्रोसिक्युशन आदी विभागांचे जलद दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४
पर्यटनाला “आई” ची चालना कर्जावरील व्याजाची होणार प्रतिपूर्ती योजनेसाठी अमरावती विभागातून 64 अर्ज प्राप्त
पर्यटनाला “आई” ची चालना कर्जावरील व्याजाची होणार प्रतिपूर्ती
योजनेसाठी अमरावती विभागातून 64 अर्ज प्राप्त.
अमरावती, दि. 17: विभागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी गेल्या वर्षभरापासून “आई” हे महिला केंद्रित पर्यटन योजना सुरु करण्यात आली आहे. या याजनेच्या माध्यमातून महिलांना पर्यटन स्थळी व्यवसाय करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या 15 लाखापर्यत कर्जावरील 12 टक्के पर्यतच्या मर्यादित व्याजाचा परतावा उपलब्ध होत आहे. यासाठी अमरावती विभागातून 64 अर्ज आले असून अमरावती मधून 32, यवतमाळ मधून प्रत्येकी 27 असे अर्ज प्राप्त झाले आहेत.अशी माहिती अमरावती विभाग पर्यटन सुचालनालयाचे उपसंचालक विजय अवधाने यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत पर्यटनक्षेत्र वेगाने विस्तारत आहे. या क्षेत्रात महिलांना उद्यमशीलतेचे पाठबळ देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने केला जात आहे. पर्यटनमध्ये महिलांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालविणे गरजेचे आहे. टुर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये 50 टक्के महिला कर्मचारी असणे आवश्यक असून पर्यटन क्षेत्राशी निगडित 41 प्रकारचे व्यवसाय महिला करु शकतात. यासाठी पर्यटन विभागाकडून 12 टक्के पर्यतच्या मर्यादित व्याजाचा परतावा उपलब्ध होत आहे.
पायाभूत सुविधा, पर्यटनाच्या सुरक्षेला प्राधान्य, महिला उद्योजकता विकास, महिला पर्यटकांसाठी उत्पादने, प्रवास आणि पर्यटन विकास ही आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे. अमरावती विभागात अनेक पर्यटनस्थळे आहेत.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील महिलांना व्याज परताव्यासाठी 32 लेटर ऑफ इंटेट निर्गमित केले आहेत. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागात एकुण 64 अर्ज आले आहेत. महिला केंद्रीत धोरणानुसार महिलांना पर्यटनक्षेत्रामध्ये पर्यटन व्यवसायासाटी कर्ज घेतल्यास त्याच्या व्याजाची प्रतीपूर्ती पर्यटन संचालनालयामार्फत केली जाणार आहे. (व्यवसायाचे नाव होमस्टे, हॉटेल, रेस्टारेंट,टुर्स ॲन्ड ट्रव्हल कॅराव्हॅन, ई- व्हेहीकल (रिक्षा, मोटर सायकल बस इतर चारचाकी वाहने) साहसी पर्यटन (जमिन, हवा, जल) पर्यटन सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्राजवळील प्रसादाची, खेळणीची दुकाने सोव्हेनियर शॉप इ.) या योजनेचा लाभ घेवू इच्छिवनाऱ्या महिलांनी पर्यटन विभागाच्या येथील उपसंचालक कार्यालयाशी संपर्क करावा या कार्यालयाचा संपर्क दुरध्वनी क्रमांक 0721-2990457 हा आहे. असे आवाहन ही अमरावती विभाग पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय अवधाने यांनी केले आहे.
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
नागपूर, दि. १७ : विधानसभा कामकाजासाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात जाहीर केली.
विधानसभा तालिका सभाध्यक्षपदी सदस्य सर्वश्री विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम, दिलीप सोपल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले.
माजी मंत्री दत्तात्रय राणे यांना विधानसभेत श्रद्धांजली
माजी मंत्री दत्तात्रय राणे यांना विधानसभेत श्रद्धांजली
नागपूर, दि. १७ : विधानसभेचे माजी सदस्य व माजी मंत्री दत्तात्रय महादेव राणे यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिवंगत माजी सदस्य दत्तात्रय राणे यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला
सोमवार, १६ डिसेंबर, २०२४
तालिका सभापतींच्या नावांची घोषणा
तालिका सभापतींच्या नावांची घोषणा
नागपूर, दि. 16 : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी नियुक्त नावे जाहीर केली.
तालिका सभापती पदी सर्वश्री निरंजन डावखरे, शिवाजीराव गर्जे, कृपाल तुमाने, सुनील शिंदे, धीरज लिंगाडे यांच्या नावाची घोषणा श्रीमती गोऱ्हे यांनी केली.
बीड येथील घटना गंभीर; प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बीड येथील घटना गंभीर; प्रकरणातील
आरोपींवर कडक कारवाई करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 16 : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घटना गंभीर असून यास सरकारने गांभीर्याने घेतले आहे. संबंधीत आरोपी व दोषी पोलीसांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 289 अन्वये उपस्थित केलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या घटनेसाठी ‘सीआयडी’ची एक विशेष एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तांत्रिक व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून फरार आरोपींना लवकरच पकडण्यात येईल. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यांस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून एकास निलंबित करण्यात आले आहे. आरोपी कोणत्याही जाती, धर्माचा किंवा राजकीय पक्षाचा असला तरी तसेच कोणत्याही दबावाचा विचार न करता यासंदर्भात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 16 : मुंबईतील बेस्ट बसच्या अपघाता़ची घटना गंभीर असून राज्य शासनाने याची दखल घेतली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानपरिषदेत नियम 289 अन्वये विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले की, ‘बेस्ट’ बसच्या अपघातातील वाहनचालकाची तपासणी केली आहे. या घटनेनंतर यादृच्छिक (रॅन्डम) पद्धतीने तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. बेस्टमध्ये नवीन बसेस घेण्यासाठी 1300 बसेसची मागणी नोंदविण्यात आली असून त्या लवकरच बस ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार आहेत. बेस्ट बसेसची वस्तुस्थिती जाणून घेऊन उपाययोजना राबविण्यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांना ‘बेस्ट’ प्रमुखांशी चर्चा करून आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या पीठासीन अधिकारी होत्या.
तबल्याचा ताल हरपला झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
तबल्याचा ताल हरपला
झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
नागपूर, दि. 16 : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने सबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले. तीन पिढ्यांसोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले. तबला क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली. तबलानवाज पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन आणि तबला हे अद्वैत होते. हे अद्वैत आता भंगले आहे. जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडलात उभे केलेल्या अनेक अद्भुत मैफिली यापुढे तालयोगी तबलानवाझ उस्ताद झाकिर हुसेन यांच्याविना सुन्यासुन्या वाटत राहतील. वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाची सुरुवात करणाऱ्या उस्ताद झाकिर हुसेन यांनी तबलावादनातील एकल मैफिलींनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संगीताला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यात हुसेन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे शिष्य जगभर संगीताची सेवा करत आहेत. वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी केवळ जोपासलाच नाही तर तबलावादनाला अत्युच्च अशा शिखरावर नेले. गाणारा तबला ही त्यांच्या जादुई बोटांची करामत अनेकांनी अनुभवली आहे. ज्येष्ठ कलाकारांबरोबर केलेली जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी होती. तरूण आणि होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांची कला सादर व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तबल्याला समानार्थी नाव झाकीर हुसेन होते. साथीच्या या वाद्याला त्यांनी व्यासपीठाच्या केंद्रस्थानी आणून त्याला जनमनात स्थान मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनांच्या ऐतिहासिक वाटचालीला अधोरेखित करणाऱ्या ग्रंथाची होणार निर्मिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनांच्या
ऐतिहासिक वाटचालीला अधोरेखित करणाऱ्या ग्रंथाची होणार निर्मिती
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली
संपादक व ज्येष्ठ पत्रकारांची बैठक
ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळाची निर्मिती
नागपूर, दि. 16 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भ विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांवर सभागृहात झालेल्या चर्चा ते लोकाभिमूख शासन निर्णयापर्यंतचा एक मैलाचा टप्पा नागपूर विधानभवनाने अनुभवला आहे. येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते अनुशेषापर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा हिवाळी अधिवेशनात झाल्या आहेत. याचा आढावा घेणारा परिपूर्ण संदर्भ ग्रंथ साकारावा असा मानस आहे. येथील तिन्ही पिढ्यांचा सहभाग असलेले सशक्त संपादक मंडळ या ग्रंथाची दिलेल्या मुदतीत अभ्यासपूर्ण निर्मिती करेल असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
येथील विधानभवनात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक यांची विशेष बैठक उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निमंत्रीत केली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील राष्ट्रकुल समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस विधानभवनचे सचिव 2 (कार्यभार) विलास आठवले, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, नागपूर विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, माजी संपादक सुधीर पाठक, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्रा, लोकमतचे संपादक श्रीमंत माने, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, पुण्य नगरीचे संपादक रमेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, आनंद निर्वाण, विश्वास इंदुलकर, शैलेश पांडे, महेश उपदेव, रवी गुळकरी, विकास वैद्य, वैभव गांजापुरे व इतर सन्माननिय पत्रकार उपस्थित होते. या संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांनी आपले योगदान देण्याचे सहर्ष मान्य केले.
‘नागपूर येथील हिवाळी अधिवेशने – विधानपरिषदेतील ऐतिहासिक पाऊलखुणा’ या ग्रंथाच्या परिपूर्ण निर्मितीसाठी संपादकीय मंडळ निश्चित करण्याचा सर्वांच्या वतीने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. यात प्रदीप मैत्र, कार्याध्यक्ष, श्रीपाद अपराजित, श्रीमंत माने, गजानन निमदेव, रमेश कुलकर्णी, शैलेश पांडे, भुपेंद्र गणवीर, महेश उपदेव, प्रभाकर धुपारे, मनिष सोनी, आनंद निर्वाण, विकास वैद्य आणि नागपूर – अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे. समन्वय संपादक निलेश मदाने यांचा समावेश आहे. आवश्यक तो विस्तार यात चर्चेनुसार केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले.
या प्रस्तावित ग्रंथासंदर्भात चर्चा करताना यातील मजकूर हा संशोधन व संदर्भाच्या दृष्टीने पूरक असावा असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. विशेषतः हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करताना पत्रकारांनी जे अनुभवले ते यात प्रतिबिंबित झाल्यास त्यातील वाचनियता वाढेल यावर सर्वांचे एकमत झाले.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार व संपादक यांना ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’ या महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या प्रती देऊन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
0000
लोकराज्य दुर्मिळ अंकांचे डिजिटायजेशन करावे - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
लोकराज्य दुर्मिळ अंकांचे डिजिटायजेशन करावे
- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
• विधानभवन परिसरात ‘लोकराज्य दुर्मिळ अंक’ प्रदर्शनाचे उद्घाटन
• मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन केले कौतुक
नागपूर, दि. 16 : ‘लोकराज्य’ चे दुर्मिळ अंक हे माहितीचा अमूल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन होण्याकरिता या अंकांचे डिजिटायजेशन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी विधानभवन परिसरातील लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन राज्याच्या गौरवशाली परंपरेच्या माहितीचा ठेवा असणाऱ्या या प्रदर्शनाचे कौतुक केले.
उद्घाटन प्रसंगी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे, लोकराज्यचे संपादक तथा संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, वरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, वर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी यावेळी उपस्थित होते.
महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच या दुर्मिळ अंकांचा ठेवा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटायझेशन आणि अन्य आधुनिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. दुर्मिळ अंकांच्या मांडणीचे कौतुकही त्यांनी केले.
प्रदर्शनात वैविध्यपूर्ण माहितीचा ठेवा असणारे दुर्मिळ अंक
1964 पासूनचे अंक येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित अंक, मराठी संगीत रंगभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, मराठवाडा विकास व सांस्कृतिक अंक, स्वातंत्र्यदिन विशेषांकासह महाराष्ट्र राज्यातील महान व्यक्तीमत्वे, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक असा वैविध्यपूर्ण ठेवा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे 150 अंक या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत.
मान्यवरांच्या भेटी व सेल्फी स्टँडवर छायाचित्रे
विधीमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने विधानभवन परिसरात विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची लगबग होती. वाटेतच लोकराज्य दुर्मिळ अंकांचे आकर्षक प्रदर्शन दिसताच त्यांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी पाहणी करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी स्टँडवर पोज देऊन छायाचित्रेही काढून घेतली.
भेट देणाऱ्यांमध्ये मंत्री, ॲड. आशिष जायस्वाल, आमदार सर्वश्री प्रविण दरेकर, चित्रा वाघ, बाबुसिंग राठोड, अबु आझमी, श्रीजया चव्हाण, सुहास बाबर, देवराव भोंगळे यांचा समावेश आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, वनविभागाचे उपसचिव विवेक होशिंग, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धिरज अभंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनास भेट दिली. अधिवेशन कालावधीमध्ये दररोज सकाळी 9 वाजता पासून हे प्रदर्शन पाहण्यास उपलब्ध राहणार आहे.
0000
कलाविश्वाचा ताल चुकला - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली
कलाविश्वाचा ताल चुकला - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली
नागपूर, दि.16 : भारतीय अभिजात संगीताचा समृध्द खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचे हे नुकसान कधीही भरुन येणारे नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला आणि डग्ग्याच्या जोडीत जणू नादब्रह्म सामावले होते.
उस्ताद अल्लारखाँ साहेबांसारखा पिता आणि गुरु त्यांना घरातच लाभला. कुरेशी घराणे हे तालविश्वातील एखाद्या नक्षत्रासारखे अढळ होते. अतिशय साधी राहाणी, आणि कुठलाही कर्मठपणा व्यक्तिमत्त्वात नसलेले उस्तादजी रसिकांना क्षणार्धात आपलेसे करत. भजनी ठेक्यापासून तबल्याचे अवघड कायदे आणि अनवट ताल त्यांच्या बोटात जणू वस्तीला होते. दिग्गज गायक-वादकांना संगत तर ते करत होतेच, पण तीन-तीन तास तबल्याची सोलो मैफल रंगवणारे बहुदा ते पहिलेच उस्ताद असतील. तबलावादनाला सरस्वतीचे पूजन मानणारा हा कुणी देवदूतच पृथ्वीवर येऊन गेला, असे आता म्हणावे लागेल.
तबल्याचा ताल हरपला! झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
तबल्याचा ताल हरपला!
झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, १६ डिसेंबर: प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याच्या ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने संबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले. तीन पिढ्यांसोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले. तबल्याच्या क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली. तबलानवाज पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन आणि तबला हे अद्वैत होते. हे अद्वैत आता भंगले आहे. जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडलात उभे केलेल्या अनेक अद्भुत मैफिली यापुढे तालयोगी तबलानवाझ उस्ताद झाकिर हुसेन यांच्याविना सुन्यासुन्या वाटत राहतील. वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाची सुरवात करणाऱ्या उस्ताद झाकिर हुसेन यांनी तबलावादनातील एकल मैफिलींनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संगीताला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यात हुसेन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे शिष्य जगभर संगीताची सेवा करत आहेत. वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी केवळ जोपासलाच नाही तर तबलावादनाला अत्युच्च अशा शिखरावर नेले. गाणारा तबला ही त्यांच्या जादुई बोटांची करामत अनेकांनी अनुभवली आहे. ज्येष्ठ कलाकारांबरोबर केलेली जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी होती.
तरूण आणि होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांची कला सादर व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तबल्याला समानार्थी नाव झाकीर हुसेन होते. साथीच्या या वाद्याला त्यांनी व्यासपीठाच्या केंद्रस्थानी आणून त्याला जनमनात स्थान मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
उस्ताद झाकीर हुसेन यांनी जाणकार व जनसामान्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले - राज्यपाल सी पी राधाकृष्णन
उस्ताद झाकीर हुसेन यांनी जाणकार व जनसामान्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
- राज्यपाल सी पी राधाकृष्णन
मुंबई, दि. १६ : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विश्वविख्यात तबला नवाज पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेत निधन झाल्याचे वृत्त भारतीय संगीत विश्वाकरिता अत्यंत धक्कादायक आहे.
उस्ताद अल्ला रखा यांचे सुपुत्र व सच्छिष्य असलेल्या झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर नेले.
प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली व अंगभूत प्रतिभेमुळे झाकीर हुसेन यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जाणकार आणि जनसामान्य श्रोते अशा दोघांनाही आपल्या अभूतपूर्व तबलावादनाने मंत्रमुग्ध केले. त्याचे तबला वादन ऐकून लाखो युवक युवती तबला वादनाकडे वळले.
भारतीय शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवून एकल तबला वादनाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. साथ संगीतकार म्हणून आपला अमीट ठसा उमटवताना त्यांनी तीन पिढ्यांच्या गायक संगीतकारांसोबत तबलावादन केले.
त्यांच्या निधनामुळे भारताने-विशेषतः महाराष्ट्राने आपला अत्यंत लाडका सुपुत्र व संगीत क्षेत्रातील तेजस्वी तारा गमावला आहे. झाकीर हुसेन यांचे संगीत चिरंतन राहील व संगीतकारांच्या पिढ्यांना नवनिर्मितीसाठी प्रेरित करील. या दुःखद प्रसंगी मी दिवंगत उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय व लाखो संगीत चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
लोकराज्य दुर्मिळ अंकाचे डिजीटायजेशन व्हावे - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
लोकराज्य दुर्मिळ अंकाचे डिजीटायजेशन व्हावे
- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विधानभवन परिसरात ‘लोकराज्य दुर्मिळ अंक’ प्रदर्शनाचे उद्घाटन
Ø मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन केले कौतुक
नागपूर, दि. 16 : लोकराज्य दुर्मिळ अंक हे माहितीचा अमुल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन होण्याकरिता या अंकांचे डिजीटायजेशन व्हावे, अशा सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज विधानभवन परिसरात लावण्यात आलेल्या लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या या प्रदर्शनास मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन राज्याच्या गौरवशाली परंपरेच्या माहितीचा ठेवा असणाऱ्या या प्रदर्शनाचे कौतुक केले.
उद्घाटन प्रसंगी नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, लोकराज्यचे संपादक तथा माहिती संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे संचालक किशोर गांगुर्डे, वरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, वर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी यावेळी उपस्थित होते.
महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच या दुर्मिळ अंकांचा ठेवा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजीटायझेशन आणि अन्य आधुनिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. दुर्मिळ अंकांच्या मांडणीचे कौतुकही त्यांनी केले.
प्रदर्शनात वैविद्यपूर्ण माहितीचा ठेवा असणारे दुर्मिळ अंक
1964 पासूनचे अंक येथे लावण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित अंक, मराठी संगीत रंगभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, मराठवाडा विकास व सांस्कृतिक अंक, स्वातंत्र्यदिन विशेषांकासह महाराष्ट्र राज्यातील महान व्यक्तीमत्वे, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक असा वैविद्यपूर्ण ठेवा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे 150 अंक याठिकाणी लावण्यात आले आहेत.
मान्यवरांच्या भेटी व सेल्फी स्टँडवर छायाचित्रे
विधीमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने विधानभवन परिसरात विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची लगबग होती. वाटेतच लोकराज्य दुर्मिळ अंकांचे आकर्षक प्रदर्शन दिसताच त्यांनी भेट दिली. यावेळी पाहणी करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी स्टँडवर पोज देऊन छायाचित्रेही काढून घेतली.
भेट देणाऱ्यांमध्ये मंत्री, ॲड. आशिष जायस्वाल, आमदार सर्वश्री प्रविण दरेकर, चित्रा वाघ, बाबुसिंग राठोड, अबु आझमी, श्रीजया चव्हाण, सुहास बाबर, देवराव भोंगळे यांचा समावेश आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, वनविभागाचे उपसचिव विवेक होशिंग, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धिरज अभंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनास भेट दिली. अधिवेशन कालावधीमध्ये दररोज सकाळी 9 वाजता पासून ही पाहण्यास उपलब्ध राहणार आहे.
00000
तबल्याचा ताल हरपला झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
तबल्याचा ताल हरपला
झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
नागपूर, दि. 16 : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने सबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले. तीन पिढ्यांसोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले. तबला क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली. तबलानवाज पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन आणि तबला हे अद्वैत होते. हे अद्वैत आता भंगले आहे. जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडलात उभे केलेल्या अनेक अद्भुत मैफिली यापुढे तालयोगी तबलानवाझ उस्ताद झाकिर हुसेन यांच्याविना सुन्यासुन्या वाटत राहतील. वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाची सुरुवात करणाऱ्या उस्ताद झाकिर हुसेन यांनी तबलावादनातील एकल मैफिलींनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संगीताला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यात हुसेन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे शिष्य जगभर संगीताची सेवा करत आहेत. वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी केवळ जोपासलाच नाही तर तबलावादनाला अत्युच्च अशा शिखरावर नेले. गाणारा तबला ही त्यांच्या जादुई बोटांची करामत अनेकांनी अनुभवली आहे. ज्येष्ठ कलाकारांबरोबर केलेली जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी होती. तरूण आणि होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांची कला सादर व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तबल्याला समानार्थी नाव झाकीर हुसेन होते. साथीच्या या वाद्याला त्यांनी व्यासपीठाच्या केंद्रस्थानी आणून त्याला जनमनात स्थान मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0000
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनियतेची शपथ
Ø ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधी सोहळा
Ø मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नागपूर, दि. 15 : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती होती.
समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे- पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभुराज देसाई, अॅड.आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह भोसले, अॅड.माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद जाधव पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबीटकर यांचा समावेश आहे.
सोबतच 6 सदस्यांना राज्यपालांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यात माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर - साकोरे, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्याचे संचलन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. सोहळ्यास खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
००००
हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्यात येणार महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 15 (शिबिर कार्यालय) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण 20 विधेयके मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित मंत्रिपरिषद बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल, अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्यांवर चर्चा, सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असे कामकाज होणार असून त्यासोबत जवळपास वीस विधयेके मांडण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरिता मतदान केले आहे, म्हणून आमचे सरकार हे ‘ईव्हीएम’ सरकार आहे, पण त्या ईव्हीएमचा अर्थ ‘एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र’ असा आहे. आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घडविण्याकरिता या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे कामकाज करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसासाठी भावांतर योजना राबवून बाजारभाव व हमीभाव यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. तसेच धानाच्या शेतकऱ्याला हेक्टरी 20 हजार रुपये दिले. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणारे शासन आहे, असेही त्यांनी सांगितले.
परभणीमधील घटना ही एका मनोरुग्णामुळे घडली असून मनोरुग्णाच्या कृत्यावर कोणतेही असंविधानिक उद्रेक करणे योग्य नाही. हे शासन संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे आहे. संविधानाच्या बाहेर तसूभरही वेगळे काम करणार नाही. आमचे सरकार संविधानाचा गौरव करणारे आहे. बीड जिल्ह्यातील घटनेची विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असून आरोपी कोणीही असले तरी त्यांना सोडले जाणार नाही. अशा घटना महाराष्ट्रात गांभीर्यानेच घेतल्या जातात व यापुढेही घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’साठी काम करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आम्ही मागील अडीच वर्षे टीम म्हणून काम केले आहे. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या प्रति आम्ही उत्तरदायी आहोत. ‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहोत. शेतकऱ्यांच्या, जनतेच्या हिताचे प्रकल्प सुरू करून त्यांना चालना दिली. एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना यांची सांगड घातली. लोकाभिमुख आणि गतिमान शासन आणून यापुढेही गतिमानतेने निर्णय घेऊ. या पुढील काळात सर्वसामान्य जनतेसाठी व राज्याच्या विकासासाठी काम करणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यास महाराष्ट्र शासन हातभार लावणार आहे.
जनतेच्या विश्वासाला पात्र राहून सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार - अजित पवार
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, त्याला पात्र राहून महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न चर्चेला आले तर त्यावर निश्चितपणे उत्तर दिले जाईल. विरोधकांचा योग्य सन्मान ठेवला जाईल.
मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी झालेल्या चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवनियुक्त मंत्री, विधीमंडळ सदस्य उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार 20 विधेयके
राज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे.
विधेयकात रूपांतरित होणारे अध्यादेश:-
(१) सन २०२४ चे वि.स.वि.क्र... महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२४ (नगर विकास विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ५ चे रुपांतरीत विधेयक) अप्रत्यक्षपणे निवडलेल्या नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा पदावधी पाच वर्षे करणे,
(२) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०२४ (सामान्य प्रशासन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ६ चे रुपांतरीत विधेयक) (सर्वसाधारण बदलीसाठीच्या कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची तरतूद)
(३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा, विधेयक, २०२४. (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ७ चे रुपांतरीत विधेयक) (दंडाच्या कमाल मर्यादेत वाढ)
(४) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रदद् करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ८ चे रुपांतरीत विधेयक) (अनधिकृत हस्तांतरण नियमित करणेबाबत)
(५) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश, २०२४ (वित्त विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ९ चे रुपांतरीत विधेयक) (केंद्रीय अधिनियमाच्या अनुषंगाने सुसंगत सुधारणा करणे)
(६) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. ... महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष (सुधारणा) विधेयक, २०२४ (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १० चे रुपांतरीत विधेयक) (अपराधांच्या शिक्षेत वाढ अधिनियमाच्या तरतुदीच्या उल्लंघनाबद्दल कडक शिक्षा व दंड वाढविण्याबाबत)
(७) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या ढकलणे विधेयक, २०२४ (ग्रामविकास विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. ११ चे रुपांतरीत वि (जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापती इत्यादी पदांच्या निवडणूका पुढे ढकलणे
(८) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वनविभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १२ चे रुपांतरीत विधेयक) (शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने अनुसूची एकच्या अनुच्छेदामध्ये सुधारणा करणेबाबत)
(९) सन २०२४ चे वि.प.वि.क्र... महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सुधारणा) विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १३ चे रुपांतरीत विधेयक) (वाचन संस्कृतीचा व ग्रंथालय चळवळीचा विकास करण्यासाठी अधिनियमाच्या विवक्षीत कलमांमध्ये सुधारणा करणेबाबत)
(१०) सन २०२४ चे वि.स.वि.क्र... महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल व वन विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १४ चे रुपांतरीत विधेयक) (जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजनाचे नियमाधीकरण करण्यास परवानगी देणे आणि नियमाधीकरण अधिमुल्य कमी करुन बाजारमुल्याच्या ५ टक्के इतके निश्चित करणे)
(११) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. .. श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी,
(सुधारणा) विधेयक, २०२४ (विधि व न्याय विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १५ चे रुपांतरीत विधेयक) (विश्वस्थ समितीचा कार्यकाळ आणि समिती सदस्यांची संख्या वाढविणे)
(१२) सन २०२४ चे वि.प.वि.क्र... महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १६ चे रुपांतरीत विधेयक) (समुह विद्यापीठ घटित करणेच्या तरतुदीमध्ये सुधारणा)
(१३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४( उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १७ चे रुपांतरीत विधेयक) (नविन महाविद्यालय उघडण्यासाठी इरादापत्र मागविण्यासाठी कालावधी वाढवून देणेबाबत)
(१४) सन २०२४ चे वि.प.वि.क्र. .. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४ (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) (सन २०२४ महा. अध्या. क्र. १८ चे रुपांतरीत विधेयक)
प्रस्तावित विधेयके:-
(१) सन २०२४ चे वि.प.वि.क्र... महाराष्ट्र खाजगी विद्यापीठं दुसरी सुधारणा, विधेयक, २०२४ (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
(२) सन २०२४ चे वि.स.वि.क्र... महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विधेयक, २०२४ (गृह विभाग)
(३) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. (महसूल विभाग) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२४
(४) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. हैदराबाद अतियात चौकशी (सुधारणा) विधेयक, २०२४ (महसूल विभाग)
(५) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. विधेयक, २०२४ (महसूल विभाग) महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा)
(६) सन २०२४ चे वि.स.वि.क्र. महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२४ (वित्त विभाग)
0000
मंगळवार, १० डिसेंबर, २०२४
विभागीय टास्क फोर्स समितीची सभा संपन्न योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
विभागीय टास्क फोर्स समितीची सभा संपन्न
योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करा
-विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 10 : शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहितकारी योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करुन विहित मुदतीत विकासकामे पूर्ण होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी विभागातील जिल्हा प्रशासनाला दिले.
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय टास्क फोर्स समितीची सभा सोमवारी (ता.9 डिसेंबर) संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण उपायुक्त सुनील वारे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे, कामगार विभागाचे उपायुक्त आदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तर समितीचे सचिव तथा विकास उपायुक्त राजीव फडके प्रत्यक्षरित्या यावेळी सभेला उपस्थित होते.
डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, गोर-गरीब जनतेला हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल उपलब्ध करुन दिल्या जाते. ग्रामीण व शहरी भागातील एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित विभागांनी त्यांच्याकडील प्रलंबित घरकुलासंदर्भात आढावा घेवून ती पूर्ण होण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. अतिक्रमण नियमानुकूलची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. नवीन लाभार्थ्यांच्या संदर्भात सर्वेक्षण, घरकुल मंजूरात व पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
या सभेत ग्रामीण भागातील पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, पंडीत दीनदयाल अर्थसहाय्य योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी मदत करणे, ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास आदी विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करणे, मंजूर घरकुल पूर्ण करुन घेणे, अनुदान वितरीत करणे, नवीन लाभार्थ्यांसाठी सर्वेक्षण करणे इत्यादी महत्वपूर्ण मुद्दांबाबत आढावा घेण्यात आला आणि त्यानुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. विभागातील एकही पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी जबाबदारीपूर्वक उत्तम नियोजन करावे. तसेच योजनेंतर्गत जिल्ह्याला प्राप्त उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वंकष प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)