बुधवार, १८ डिसेंबर, २०२४
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या पुढाकाराने जिल्ह्यात कुरण लागवडीचे उद्दिष्ट
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या
पुढाकाराने जिल्ह्यात कुरण लागवडीचे उद्दिष्ट
अमरावती दि. 18 :- सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या पुढाकाराने सार्वजनिक ई- क्लास जमिनीवर तोंगलाबाद ता. दर्यापूर येथे मनरेगा अंतर्गत कुरण लागवड करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अमरावती जिल्ह्यास कुरण लागवडीचे प्रती तालुक्यास 1 हेक्टर या प्रमाणात उद्दिष्ट स्व. वंसतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व संबंधित आधिकारी व कर्मचारी यांना सुचना देण्यात आल्या, शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत संभाव्य दुष्काळ परिस्थितीत चारा टंचाईवर उपाययोजना म्हणून गायरान, वैयक्तीक जमिनीवरकुरण लागवडाला मान्यता प्रदान केली आहे.
कुरण लागवडीच्या अनुषंगाने तालुकास्तरीय यंत्रणांचा आढावा घेण्यात येत असून कुरण लागवडीचा लाभ जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये गावाची निवड करण्यात आली. तोंगलाबाद गावातील बंगाली बाभळी असणाऱ्या ई क्लास, गायरान जमिनीची साफसफाई करुन तेथे मग्रारोहयो अंतर्गत गावातील लोकांच्या सहभागातून 2 हेक्टर क्षेत्रावर नेपीअर चारा गवताची लागवड करण्यात आली. गावातील लोकांच्या सहभागातून सद्यस्थितीत नेपीअर चारा पिकाचे चांगल्या प्रकारे संगोपन करण्यात येत असून साधारणता 2 फूट पर्यंत वाढ झालेली आहे. अंदाजे 30 दिवसानंतर चारा पिक कापणीस तयार होणार असून गावातील पशुधारक शेतकऱ्यास निशुल्क वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे गावात असणाऱ्या 294 जनावरांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, तोंगलाबाद गावातील संरपच वैशाली निरंजन पानझाडे, उपसरपंच सुभाष जउळकार, ग्रामसेवक चंद्रकांत भटकर, ग्राम रोजगार सेवक सोपान जउळकार यांचे प्रयत्नामुळे कुरण लागवड अत्यंत दर्जेदार झालेली आहे. अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी दिली आहे.
000000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा