मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४
पर्यटनाला “आई” ची चालना कर्जावरील व्याजाची होणार प्रतिपूर्ती योजनेसाठी अमरावती विभागातून 64 अर्ज प्राप्त
पर्यटनाला “आई” ची चालना कर्जावरील व्याजाची होणार प्रतिपूर्ती
योजनेसाठी अमरावती विभागातून 64 अर्ज प्राप्त.
अमरावती, दि. 17: विभागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी गेल्या वर्षभरापासून “आई” हे महिला केंद्रित पर्यटन योजना सुरु करण्यात आली आहे. या याजनेच्या माध्यमातून महिलांना पर्यटन स्थळी व्यवसाय करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या 15 लाखापर्यत कर्जावरील 12 टक्के पर्यतच्या मर्यादित व्याजाचा परतावा उपलब्ध होत आहे. यासाठी अमरावती विभागातून 64 अर्ज आले असून अमरावती मधून 32, यवतमाळ मधून प्रत्येकी 27 असे अर्ज प्राप्त झाले आहेत.अशी माहिती अमरावती विभाग पर्यटन सुचालनालयाचे उपसंचालक विजय अवधाने यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत पर्यटनक्षेत्र वेगाने विस्तारत आहे. या क्षेत्रात महिलांना उद्यमशीलतेचे पाठबळ देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने केला जात आहे. पर्यटनमध्ये महिलांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालविणे गरजेचे आहे. टुर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये 50 टक्के महिला कर्मचारी असणे आवश्यक असून पर्यटन क्षेत्राशी निगडित 41 प्रकारचे व्यवसाय महिला करु शकतात. यासाठी पर्यटन विभागाकडून 12 टक्के पर्यतच्या मर्यादित व्याजाचा परतावा उपलब्ध होत आहे.
पायाभूत सुविधा, पर्यटनाच्या सुरक्षेला प्राधान्य, महिला उद्योजकता विकास, महिला पर्यटकांसाठी उत्पादने, प्रवास आणि पर्यटन विकास ही आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे. अमरावती विभागात अनेक पर्यटनस्थळे आहेत.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील महिलांना व्याज परताव्यासाठी 32 लेटर ऑफ इंटेट निर्गमित केले आहेत. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागात एकुण 64 अर्ज आले आहेत. महिला केंद्रीत धोरणानुसार महिलांना पर्यटनक्षेत्रामध्ये पर्यटन व्यवसायासाटी कर्ज घेतल्यास त्याच्या व्याजाची प्रतीपूर्ती पर्यटन संचालनालयामार्फत केली जाणार आहे. (व्यवसायाचे नाव होमस्टे, हॉटेल, रेस्टारेंट,टुर्स ॲन्ड ट्रव्हल कॅराव्हॅन, ई- व्हेहीकल (रिक्षा, मोटर सायकल बस इतर चारचाकी वाहने) साहसी पर्यटन (जमिन, हवा, जल) पर्यटन सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्राजवळील प्रसादाची, खेळणीची दुकाने सोव्हेनियर शॉप इ.) या योजनेचा लाभ घेवू इच्छिवनाऱ्या महिलांनी पर्यटन विभागाच्या येथील उपसंचालक कार्यालयाशी संपर्क करावा या कार्यालयाचा संपर्क दुरध्वनी क्रमांक 0721-2990457 हा आहे. असे आवाहन ही अमरावती विभाग पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय अवधाने यांनी केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा