सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीएचडीप्राप्त अनिकेत देशमुखचा सत्कार पीएचडी प्राप्त करणारा पहिला अनाथ

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीएचडीप्राप्त अनिकेत देशमुखचा सत्कार पीएचडी प्राप्त करणारा पहिला अनाथ अमरावती, दि. 30 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये पीएचडी प्राप्त करणारा अनिकेत वीरेंद्र देशमुख यांचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे श्री. देशमुख हे अमरावती जिल्ह्यातून डॉक्टरेट प्राप्त करणारे पहिले अनाथ विद्यार्थी ठरले आहेत. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचे अनिकेत वीरेंद्र देशमुख यांनी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट पूर्ण केली आहे. त्यांनी 'कलम 35 ए रद्द करणे : कारणे आणि परिणाम' या विषयावर पीएचडीचा शोध प्रबंध सादर केला आहे. विद्यापीठाने 20 डिसेंबर रोजी अधिसूचना काढून त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा