गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज सादर करण्यास दि. 16 डिसेंबर, पर्यंत मुदतवाढ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज सादर करण्यास दि. 16 डिसेंबर, पर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि.5 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या शासकीय वसतिगृहात प्रवेश आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासनाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आलेली आहेत.
शैक्षणिक संस्थामध्ये काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीया अद्यापही सुरु आहेत. ही बाब लक्षात घेवून विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्र 2024-25 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास दि. 16 डिसेंबर 2024 पर्यंत यापुर्वी मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे दिलेल्या मुदतीत अर्ज सादर केलेले आहेत आणि या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे आपोआप स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचे पुन्हा नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी स्वाधार योजनेचा लाभ घेतला असुन अभ्यासक्रमांच्या पुढच्या वर्षासाठी अशा विद्यार्थ्यांना सुध्दा संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र, सद्यस्थितीत स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले विद्यार्थी तसेच नव्याने स्वाधार योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांना संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करतांना तांत्रिक अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी संघटना आणि क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी यांनी या योजनेचे अर्ज भरण्यात मुदतवाढ देण्याबाबत आयुक्तालयास मागणी केलेली आहे. या बाबी विचारात घेता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 16 डिसेंबर, 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. दिलेल्या वाढीव मुदतीत पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचे अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
तेव्हा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी दि.16 डिसेंबर, 2024 पर्यंत या योजनेचे अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्यात यावे. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा