मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिनोत्सव, विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना

 भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिनोत्सव

 

विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना

 

 

अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्तालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. विभागीय आयुक्तांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.

राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली.

यावेळी उपायुक्त (साप्रवि) संजय पवार, उपायुक्त (पुरवठा) रमेश आडे, उपायुक्त (विकास) राजीव फडके, उपायुक्त (नियोजन) हर्षद चौधरी, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, तहसीलदार संतोष काकडे, संतोष डोईफोडे, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

 

0000

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य माहिती आयोगात ध्वजारोहण

 प्रजासत्ताक दिनानिमित्त

राज्य माहिती आयोगात ध्वजारोहण

 

अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य माहिती आयोग, खंडपीठ अमरावती कार्यालयात आज उप सचिव देविसिंग डाबेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

यावेळी आयोगातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व पोलीस कर्मचाऱ्यांकडून मानवंदना याप्रमाणे कार्यक्रम सपन्न झाला.

0000

शेगाव (जि.बुलडाणा) येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा 23 कंपन्या सहभागी होणार ; 1227 पदांसाठी भरती होणार

 शेगाव (जि.बुलडाणा) येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा

23 कंपन्या सहभागी होणार ; 1227 पदांसाठी भरती होणार

ऑनलाईन नोंदणीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ

 

अमरावती, दि. 29 : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला स्थानिक तसेच इतर विभागातील नामवंत खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री. संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी श्री. संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय, शेगाव, जि. बुलडाणाय येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील 23 कंपन्या, उद्योगसमुह, कारखाने यांच्या आस्थापनेवरील सुमारे 1 हजार 227 कुशल, अकुशल रिक्त पदांसाठी रोजगारभरती होणार आहे. या सुवर्ण संधीचा अमरावती विभागातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता उपायुक्त  द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यात जीनस इन्फ्रा प्रा.लि.,पिपल ट्री व्हेंचर प्रा.लि., ए.जी.एस इंशुरन्स, पेटीएम, जाधव ग्रुप ऑफ कंपनी, लक्ष्मी अग्णी कंपनी प्रा.लि.,सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट सो.ली., नवभारत फर्टीलायझर, टॅलेनसेतू प्रा.लि.,सी.ए.जी.एल, एल.आय.सी., कल्पतरु स्कील डेव्हलपमेंट अकॅडमी, इलेगन्ट कोटींग प्रा.लि.,हेंड मोटर्स एल.एस.पी.प्रा.लि., पीएनबी मेटलाईफ इंडिया इंशुनन्स प्रा.लि., पियाजिओ व्हिकल्स प्रा.लि.बारामती, अलाईड रिसोस मॅनेजमेंन्ट सर्विस प्रा.लि. पुणे, धुत ट्रान्समिशन प्रा.लि.छ.संभाजीनगर, टॅलेंट सेतू, पुणे, परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. छ.संभाजीनगर, पिपल ट्री व्हेचर्स प्रा.लि.नागपूर आदी 23 नामांकित कंपन्या मार्फत रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, इंजिनिअरींग, पदवी, पदव्युत्तर, पदविका तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखती देवून रोजगाराचा लाभ घेता येईल.

अमरावती विभागातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळावा मधून नोकरी देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्याचाच भाग जागेवरच निवड मोहीमेच्या (ऑन स्पॉट सिलेक्शन) माध्यमातून विविध  उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरिता कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.

 

विभागीय रोजगार मेळाव्यात ऑनलाईन नोंदणी अशा पध्दतीने करावी :

 

या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी (प्लेसमेंट ड्राईव्ह) http://surl.li/mbrkg या लिंकवर जाऊन नि:शुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. किंवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळाला भेट देवून नि:शुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली असल्यास www.rogar.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर जावून Employment वर क्लिक करावे Job Seeker , Find a Job ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर JOBSEEKER LOGIN हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक आणि पासवर्ड क्रमांकाचा वापर करुन LOGN व्हावे. त्यानंतर Pandit Dindayal Upadhyay Jon Fair हा पर्याय निवडावा. अमरावती विभाग निवडून फिल्टर द्यावे. त्यानंतर आपल्याला अमरावती विभागातील रोजगार मेळाव्यांची यादी दिसून येईल. त्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय महारोजगार मेळावा शेगाव, जि. बुलडाणा ऑफलाईन दि. 2 फेब्रुवारी 2024 मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर Vaccancy List  या टॅबवर क्लिक करावे. I Agree  हा पर्याय निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदे दिसून येतील त्यानंतर Apply बटणावर क्लिक करावे. शेवटी Succcessfully Applied for the Job असा संदेश दिसेल. ऑनलाईन नोंदणी करताना काही अडचण आल्यास कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती या कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 0721-2661950 यावर किंवा ई- मेल rojgarddamravati@gmail.com  वर संपर्क करावा,

तरी इच्छुक उमेदवारांनी 2 फेब्रुवारीला संत गजानन महाराज अंभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव जि. बुलडाणा येथे स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांसह (ऑनलाईन सेवायोजन कार्ड, निवडणूक ओळखपत्र/आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, दोन पासपोर्ट फोटो, बायोडाटा व इतर आवश्यक साहित्यासह) रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन उपायुक्त द. ल. ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

00000


--

मुलांच्या अनुरक्षणगृहासाठी इमारत मिळण्याबाबत आवाहन

 मुलांच्या अनुरक्षणगृहासाठी इमारत मिळण्याबाबत आवाहन

 

अमरावती, दि. 30 : महिला व बाल विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय मुलांचे अनुरक्षणगृहासाठी अमरावती शहरात 650 वर्ग मीटर बांधकाम असलेली इमारत भाडे तत्वावर मिळण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

ज्या इमारत मालकाकडे 650 वर्ग मीटर बांधकामासह सर्व सोयीसुविधा असलेली इमारत उपलब्ध असेल, त्यांनी अधिक्षक, शासकीय मुलांचे अनुरक्षणगृह, जुन्या गोपाल टॉकीज जवळ, राजापेठ, अमरावती यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, संपर्क क्रमांक दुरध्वनी क्र. 0721-2650533, भ्रमणध्वनी क्र. 7385155112  असा आहे.

0000

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळबाबत सूचना जारी

 

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना

वाढीव वेळबाबत सूचना जारी

 

        अमरावती दि. 24 :  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.

 इ. दहावी व इ. बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाजघटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु, प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी - मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.

तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षासाठी पुढीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे.

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांचे वेळीही सकाळच्या सत्रात स. 11.00 वाजता तसेच दुपारच्या सत्रात दु. 3.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल.

सकाळच्या सत्रात स. 10.30 वाजता तसेच दुपारच्या सत्रात दु. 2.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

           परीक्षेच्या सुधारित वेळ पुढीलप्रमाणे

सकाळच्या सत्रासाठी 11.00 ते दु. 2.10, स. 11.00 ते दु. 1.10, स. 11.00 ते दु. 1.40 याप्रमाणे वेळा असतील. तर दुपारच्या सत्रात दु. 3.00 ते सायं. 6.10, दु. 3.00 ते सायं. 5.10, दु. 3.00 ते सायं. 5.40 याप्रमाणे वेळ असतील, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 



नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

अमरावती, दि. 23 : आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज उपायुक्त संजय पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

            यावेळी सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

 विकास आराखड्यातील कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करा

                                                        - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 

      विभागीय आयुक्तांकडून लोणार विकास आराखड्यांतील विकासकामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी

    

अमरावती, दि. २१ : लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेली कामे प्रगतीपथावर असून  आराखड्यातील उर्वरित कामे नियोजित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.  निधी पाण्डेय यांनी दिले.

 

             लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेल्या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी व विकासकामांच्या प्रगतीचा आढावा डॉ. पाण्डेय यांनी शनिवारी (ता.२० जानेवारी) लोणार येथे घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, समितीचे सदस्य तथा न्यायालयीन मित्र ॲड. एस. सान्याल, ॲड. दिपक ठाकरे, ॲड. कप्तान, ॲड. परचुरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, वनविभाग, नगरपरिषद, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

 

           श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बुलडाणा जिल्ह्यातील बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगविख्यात आहे. हे स्थळ जैवविविधतेने सपन्न असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकास तसेच परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे 369 कोटी 78 लक्ष रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी समितीव्दारे नियमितपणे आढावा घेण्यात येतो. आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद उपब्धत करुन देण्यात आली आहे. त्यानुसार आरखड्यातील विकासकामे गतीने पूर्ण होण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. विकास आराखड्यांतर्गत येणारी लोणार सरोवर व परिसरातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

 

 

 

           

सरोवराचे पाणी व जैवविविधतेसंबधी संशोधन करण्यासाठी संशोधकांना नवीन संधी व दिशा उपलब्ध आहेत. यासाठी शासनाद्वारे वैज्ञानिक सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली असून त्याअनुषंगाने नवीनतम संशोधनाला गती देण्यात यावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी केल्या.

 

विकास आराखड्यांतर्गत भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या १५ मंदिरांचे जतन, संरक्षण व सुशोभिकरण व दुरुस्तीची कामे टप्प्या टप्प्याने सुरु आहेत. त्या कामांना गती देवून ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात यावे, असे निर्देश समिती सदस्यांनी यावेळी दिले.

 

सरोवर परिसरातील ‘ईको टुरिझम’चे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वनविभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे. लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची उभारण्याची कामे गतीने पूर्ण करण्यात यावी तसेच पूर्णत्वास गेलेल्या कामांचा अहवाल समितीला सादर करण्यात यावा, अशा सूचनाही डॉ. पाण्डेय संबंधित विभागाला दिल्या.

 

विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान केंद्र व संशोधन प्रयोगशाळेच्या ठीकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामांचा आढावा समितीने घेतला.

 

याप्रसंगी विभागीय आयुक्त व समिती सदस्यांनी सरोवरातील वाढलेल्या पाण्याचे व वेडी बाभूळ, भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारिततील पापरेश्वर मंदिर, गो-मुख, देवी पॉइंट आदी विविध स्थळांना समितीने भेटी देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

 

पाहणी दौऱ्यात आणि बैठकीस नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय पुरातत्त्व विभाग,पाटबंधारे विभाग, अमरावती विद्यापीठ,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वनविभाग,आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

00000




मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीस प्रारंभ, प्रगणकांना सहकार्य करा; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

 

मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीस प्रारंभ

 

प्रगणकांना सहकार्य करा; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

 

             अमरावती, दि. 22 : राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी सर्वेक्षणाचे काम 23 ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. 

              राज्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचे हे काम 23 ते 31 जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य मागासवर्ग आयोगाने दिल्या आहेत.

             मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वेक्षणाबाबत नागरिकांना माहिती व्हावी तसेच सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकाला प्रत्येक घरातून अचूक माहिती दयावी, असे आवाहन केले आहे. मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तहसिलदार यांच्या नियंत्रणाखाली प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. ते 23 ते 31 जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. तरी नागरिकांनी सर्वेक्षण कालावधीत घरी उपस्थित राहून सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

 

          मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे( निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा, आणि कुणबीच्या नोंदी शोधण्याकरिता सप्टेंबर 2023 मध्ये शासनाने समिती तयार केली. या समितीने महाराष्ट्रभर कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याकरिता विशिष्ट कार्यक्रम  राबवून त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात नोंदी शोधण्याचे कार्य अमरावती जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर आणि विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून केले. या शोध मोहिमेतून जिल्हाभरात 7 लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी शोधण्यात आल्या. जिल्हा प्रशासनातर्फे या सर्व नोंदी http://amravati.gov.in या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

       जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपणास आवश्यक असणाऱ्या आपल्या संबंधीच्या कुणबी जातीच्या नोंदीचे अभिलेख या संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त करून घ्याव्यात व कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचेकडे रीतसर अर्ज करावा.

00000

रविवार, २१ जानेवारी, २०२४

विकास आराखड्यातील कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करा

 






विकास आराखड्यातील कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करा

                                                        - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 

      विभागीय आयुक्तांकडून लोणार विकास आराखड्यांतील विकासकामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी

    

अमरावती, दि. २१ : लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेली कामे प्रगतीपथावर असून  आराखड्यातील उर्वरित कामे नियोजित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.  निधी पाण्डेय यांनी दिले.

 

             लोणार विकास आराखड्यांतर्गत असलेल्या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी व विकासकामांच्या प्रगतीचा आढावा डॉ. पाण्डेय यांनी शनिवारी (ता.२० जानेवारी) लोणार येथे घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, समितीचे सदस्य तथा न्यायालयीन मित्र ॲड. एस. सान्याल, ॲड. दिपक ठाकरे, ॲड. कप्तान, ॲड. परचुरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, वनविभाग, नगरपरिषद, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

 

           श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बुलडाणा जिल्ह्यातील बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगविख्यात आहे. हे स्थळ जैवविविधतेने सपन्न असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन व विकास तसेच परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे 369 कोटी 78 लक्ष रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी समितीव्दारे नियमितपणे आढावा घेण्यात येतो. आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद उपब्धत करुन देण्यात आली आहे. त्यानुसार आरखड्यातील विकासकामे गतीने पूर्ण होण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. विकास आराखड्यांतर्गत येणारी लोणार सरोवर व परिसरातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

 

 

 

           

सरोवराचे पाणी व जैवविविधतेसंबधी संशोधन करण्यासाठी संशोधकांना नवीन संधी व दिशा उपलब्ध आहेत. यासाठी शासनाद्वारे वैज्ञानिक सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली असून त्याअनुषंगाने नवीनतम संशोधनाला गती देण्यात यावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी केल्या.

 

विकास आराखड्यांतर्गत भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या १५ मंदिरांचे जतन, संरक्षण व सुशोभिकरण व दुरुस्तीची कामे टप्प्या टप्प्याने सुरु आहेत. त्या कामांना गती देवून ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात यावे, असे निर्देश समिती सदस्यांनी यावेळी दिले.

 

सरोवर परिसरातील ‘ईको टुरिझम’चे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वनविभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे. लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची उभारण्याची कामे गतीने पूर्ण करण्यात यावी तसेच पूर्णत्वास गेलेल्या कामांचा अहवाल समितीला सादर करण्यात यावा, अशा सूचनाही डॉ. पाण्डेय संबंधित विभागाला दिल्या.

 

विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान केंद्र व संशोधन प्रयोगशाळेच्या ठीकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामांचा आढावा समितीने घेतला.

 

याप्रसंगी विभागीय आयुक्त व समिती सदस्यांनी सरोवरातील वाढलेल्या पाण्याचे व वेडी बाभूळ, भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारिततील पापरेश्वर मंदिर, गो-मुख, देवी पॉइंट आदी विविध स्थळांना समितीने भेटी देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

 

पाहणी दौऱ्यात आणि बैठकीस नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय पुरातत्त्व विभाग,पाटबंधारे विभाग, अमरावती विद्यापीठ,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वनविभाग,आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय आविष्कार 2024 स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रतीक रघुवंशी राज्यात प्रथम

 

महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय आविष्कार 2024

स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी  महाविद्यालयाचा

प्रतीक रघुवंशी राज्यात प्रथम

अमरावती, दि. 17 :  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे दि. १२  ते १५ जानेवारी  या कालावधीत राज्यस्तरीय महाविद्यालय व विद्यापीठातील तरुण संशोधकांचे आविष्कार 2024 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कल्पकता, नाविन्यता, विचार, शोध, प्रतिभा, प्रगटीकरण, संशोधन या सर्व गुणांची कमी अधिक असणाऱ्या या स्पर्धेत अभियांत्रिकी विषयातील पदवी गटात अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अणुविद्युत विभागाच्या अंतीम वर्षाचा विद्यार्थी ‘प्रतीक रघुवंशी’ याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या संशोधनाचा विषय "एबल ग्लारोरा-ए नॉन सर्जिकल अँड नॉन अधेझिव्ह टाईप स्मार्ट बोन कंडनशन हिअरिंग एड युझिंग डोग ट्रान्राड्युरार" (Able Glasses A Non Surgical and Non Adhesive type smart bone conduction hearing aid using dome transducer) असा होता. प्रतिकच्या उत्तुंग यशाबद्दल महाविद्यालयीन  शिक्षकगण व अभियांत्रीकी क्षेत्रातील संशोधकांनी कौतूक केले आहे.

वर्तमानातील उद्योजकांना व लोकांना ज्या समस्या भेडसावतात त्यावर उपाय शोधण्याकरिता कल्पकतेला संशोधनाची जोड देण्यासाठी आवश्यक असलेला सक्षमपणा, स्टार्टअप व पेटंटसाठी असलेली गुणवत्तां ‘प्रतीक रघुवंशी’ याच्या संशोधनात जाणकार परीक्षकांना आढळून आली. या स्पर्धेत २३ विद्यापीठांतील जवळजवळ ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रतीक रघुवंशी हा आविष्कार २०२४ स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ चमूचा सदस्य होता. याचा त्यालाअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष आणि चिफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रतीक रघुवंशी यास प्रथम क्रमांकासाठी 35 हजार रुपये संशोधनवृत्ती देखील जाहीर झालेली आहे. ही रांशोधनवृत्ती त्याला विद्यापीठामार्फत प्रदान करण्यात येईल. प्रतीकच्या या यशात त्याचे मार्गदर्शक प्रा. ए. एम. शाह, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. देशमुख, अधिष्ठाता संशोधन डॉ. आर. एम. गेटकर, व संस्थेचे प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले यांचे मोलाचे योगदान लाभले, असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

 विभागीय आयुक्त कार्यालयात

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

 

अमरावती, दि. 12 : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज उपायुक्त संजय पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

दहावी बारावीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ

 


दहावी बारावीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ

होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ

 

अमरावती दि. 12 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी करिता खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज फॉर्म नं १७ अतिविलंब शुल्काने ऑनलाईन भरता येणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव निलिमा टाके यांनी कळविले आहे.

इयत्ता १० वी व १२ वीसाठी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रतिदिन २० रूपये या प्रमाणे स्विकारण्यात येईल, तसेच नावनोंदणी अर्ज सादर करण्याची तारीख बुधवार दि. १७ जानेवारी  २०२४ कालावधीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी               http://form17.mh-ssc.ac.in बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्‍वत:चा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.

कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाईलद्वारे कागदपत्रांचा छायाचित्र काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. विद्यार्थ्यांने संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट, शुल्क पावती, हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे.

इयत्ता 10 वी नोंदणी शुल्क 1 हजार रूपये, प्रक्रिया शुल्क 100 रूपये, विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क. इयत्ता 12 वी नोंदणी शुल्क 600 रूपये, प्रक्रिया शुल्क 100 रूपये, विलंब शुलक्‍ व अतिविलंब शुल्क. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी  व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, माध्यमि‍क शाळा, कनिष्ठ  महाविद्यालय यांचेकडून माहिती प्राप्त करून घ्यावी.

पात्र विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे यांची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

 

‘आई’ पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजिका बनण्याची संधी

 

‘आई’ पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजिका बनण्याची संधी

       अमरावती, दि. 12 : पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आई महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहिर करण्यात आले आहे. हे धोरण पर्यटन संचालनालयाव्दारे राबविण्यात येणार असून महिलांसाठी पंचसुत्री जाहिर केली आहे. या धोरणांतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सवलती दिल्या जाणार आहेत.  

            पर्यटन संचालनालयामार्फत सवलती याप्रमाणे :

पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकाचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील पर्यटन संचालनालयकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकींच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना होमस्टे, हॉटेल, रेस्टोरेंट, टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल कॅराव्हॅन, बिच शॅक, साहसी पर्यटन जमिन, हवा, जल पर्यटन सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, बी ॲण्ड बी. रिसार्ट, मोटेल, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, व्होकेशल हाऊस, पर्यटन व्हिला, एजन्सी इ.

पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी मान्यता प्राप्त बँकामार्फत घेतलेल्या रूपये 15 लाख पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम 12 टक्के मर्यादेत त्याच्या आधार लिंक बँक खात्यात पुर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत, किंवा 7 वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रूपये 5 लक्षमर्यादेपर्यंत, या तीन पर्यायापैकी जे प्रथम घडेले तो पर्यंत, दरमहा खालील अटींच्या अधिन राहुन जमा करण्यात येईल.

अटीशर्ती याप्रमाणे; पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या असावा. महिलांच्या मालकीच्या हॉटेल, रेस्टॉरेट्समध्ये 50 टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल एजन्सी मध्ये 50 टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. पर्यटन व्यवसायाकरीता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजे. अमरावती विभागातील सर्व पर्यटन महिला उद्योजकांनी जे हॉटेल रिसॉर्ट, होम स्टे. कृषी पर्यटन केंद्र, साहसी पर्यटन केंद्र, उपहारगृह, टुर गाईड, टुर ऑपरेटर अशा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नविन व्यवसाय करून येणाऱ्या महिला उद्योजकांनी व्याजाचा परतावा घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे.

0000000

 

बुधवार, १० जानेवारी, २०२४

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत

बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 09 :  राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यास अद्यापही वाव असल्याने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 6 डिसेंबर, 2023 ते 15 जानेवारी, 2024 या कालावधीत गावपातळीवर 45 दिवसांची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त कृषी यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी सर्व समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व eKYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पतीपत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या लाभार्थींनाच योजनेचा लाभ केंद्र शासन अदा करत आहे. त्यामुळे भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या (Land Seeding - No) लाभार्थींनी संबंधित तलाठी / तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे eKYC  बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) व इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या मार्फत कार्यपूर्तता करावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे पूर्तता करण्यासाठी गावच्या ग्रामस्तरीय नोडल अधिकारी / कृषी सहाय्यक यांची मदत घ्यावी.

पी. एम. किसान योजनेचा 16 वा हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्या वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 16 वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यास्तव पी. एम. किसान योजनेच्या निकषांच्या अधिन राहून योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन दिलीप झेंडे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय,पुणे यांनी केले आहे.

 

00000

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

मनुष्यबळाच्या सांख्यकीय माहितीचे विवरणपत्र 31 जानेवारीपर्यंत सादर करा

 


मनुष्यबळाच्या सांख्यकीय माहितीचे विवरणपत्र

31 जानेवारीपर्यंत सादर करा

          अमरावती, दि. 09 :  अमरावती विभागातील  अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये मनुष्यबळाचा सांख्यकीय माहितीचे त्रैमासिक विवरणपत्र दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावी, असे आवाहन कौशल, विकास, रोजगार व उद्योजकता  उपआयुक्त द. ल. ठाकरे यांनी  केले आहे.

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणा-या आस्थापनांनी त्याच्या आस्थापनेवर कार्यरत असणा-या सर्व कर्मचा-यांची             (एकुण स्त्री/पुरुष) अशी सांख्यीकी माहीती प्रत्येक तिमाहीस, सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-१ (ER-१) मध्ये नियमीतपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक व सक्तीचे आहे.

त्या अनुषंगाने माहे डिसेंबर 2023 अखेर संपणा-या तिमाहीची नमुना ईआर-१ (ER-१) मधील त्रैमासिक सांख्यीकीय माहीती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम या कार्यालयाव्दारे चालु असून, अमरावती विभागातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांकडुन शंभर टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकतस्थळावर नोदणीकृत सर्व आस्थापनांना यापुर्वीच प्राप्त युझर नेम व पासवर्डचा वापर करुन www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपल्या लॉगीन मधून माहे डिसेंबर 2023 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करावे.        विवरणपत्र सादर करण्याचे अंतीम दि. 31 जानेवारी 2024 हे आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घेऊन तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करुन सहकार्य करावे.

प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील (Employer Profile) मधील आवश्यक सर्व माहीती नोदवून तात्काळ अद्यावत करावा तसेच त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ (ER-१) किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास स्थानिक जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त श्री. ठाकरे यांनी केले आहे.  

00000