मनुष्यबळाच्या सांख्यकीय माहितीचे विवरण सादर करा
अमरावती, दि. 05 : अमरावती
विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ,
बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या
कलम 5 (1) अन्वये मनुष्यबळाचा सांख्यकीय माहितीचे त्रैमासिक विवरणपत्र दि. 31
जानेवारी 2024 पर्यंत सादर करावी, असे आवाहन कौशल, विकास, रोजगार व उद्योजकता उपआयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.
सेवायोजन
कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1)
अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी
क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणा-या आस्थापनांनी त्याच्या आस्थापनेवर कार्यरत
असणा-या सर्व कर्मचा-यांची (एकुण
स्त्री/पुरुष) अशी सांख्यीकी माहीती प्रत्येक तिमाहीस, सेवायोजन कार्यालये
(रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 तरतुदीनुसार विहीत नमुना
ईआर-१ (ER-१) मध्ये नियमीतपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक व सक्तीचे आहे.
त्या अनुषंगाने
माहे डिसेंबर २०२३ अखेर संपणा-या तिमाहीची नमुना ईआर-१ (ER-१) मधील त्रैमासिक
सांख्यीकीय माहीती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम या कार्यालयाव्दारे चालु असून,
अमरावती विभागातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांकडुन शंभर टक्के
प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकतस्थळावर नोदणीकृत सर्व आस्थापनांना यापुर्वीच प्राप्त
युझर नेम व पासवर्डचा वापर करुन www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपल्या लॉगीन मधून माहे डिसेंबर 2023
अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करावे. विवरणपत्र सादर करण्याचे अंतीम दि. 31
जानेवारी 2024 हे आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घेऊन तिमाही विवरणपत्र विहीत
मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करुन सहकार्य करावे.
प्रत्येक आस्थापनेने
आपला नोंदणी तपशील (Employer Profile) मधील आवश्यक सर्व माहीती नोदवून तात्काळ
अद्यावत करावा तसेच त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ (ER-१) किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत
करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास स्थानिक जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा,
असे आवाहन उपआयुक्त श्री. ठाकरे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा