मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

शेगाव (जि.बुलडाणा) येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा 23 कंपन्या सहभागी होणार ; 1227 पदांसाठी भरती होणार

 शेगाव (जि.बुलडाणा) येथे पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा

23 कंपन्या सहभागी होणार ; 1227 पदांसाठी भरती होणार

ऑनलाईन नोंदणीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ

 

अमरावती, दि. 29 : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला स्थानिक तसेच इतर विभागातील नामवंत खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री. संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी श्री. संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय, शेगाव, जि. बुलडाणाय येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील 23 कंपन्या, उद्योगसमुह, कारखाने यांच्या आस्थापनेवरील सुमारे 1 हजार 227 कुशल, अकुशल रिक्त पदांसाठी रोजगारभरती होणार आहे. या सुवर्ण संधीचा अमरावती विभागातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता उपायुक्त  द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यात जीनस इन्फ्रा प्रा.लि.,पिपल ट्री व्हेंचर प्रा.लि., ए.जी.एस इंशुरन्स, पेटीएम, जाधव ग्रुप ऑफ कंपनी, लक्ष्मी अग्णी कंपनी प्रा.लि.,सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट सो.ली., नवभारत फर्टीलायझर, टॅलेनसेतू प्रा.लि.,सी.ए.जी.एल, एल.आय.सी., कल्पतरु स्कील डेव्हलपमेंट अकॅडमी, इलेगन्ट कोटींग प्रा.लि.,हेंड मोटर्स एल.एस.पी.प्रा.लि., पीएनबी मेटलाईफ इंडिया इंशुनन्स प्रा.लि., पियाजिओ व्हिकल्स प्रा.लि.बारामती, अलाईड रिसोस मॅनेजमेंन्ट सर्विस प्रा.लि. पुणे, धुत ट्रान्समिशन प्रा.लि.छ.संभाजीनगर, टॅलेंट सेतू, पुणे, परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. छ.संभाजीनगर, पिपल ट्री व्हेचर्स प्रा.लि.नागपूर आदी 23 नामांकित कंपन्या मार्फत रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, इंजिनिअरींग, पदवी, पदव्युत्तर, पदविका तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखती देवून रोजगाराचा लाभ घेता येईल.

अमरावती विभागातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळावा मधून नोकरी देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्याचाच भाग जागेवरच निवड मोहीमेच्या (ऑन स्पॉट सिलेक्शन) माध्यमातून विविध  उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरिता कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.

 

विभागीय रोजगार मेळाव्यात ऑनलाईन नोंदणी अशा पध्दतीने करावी :

 

या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी (प्लेसमेंट ड्राईव्ह) http://surl.li/mbrkg या लिंकवर जाऊन नि:शुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. किंवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळाला भेट देवून नि:शुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली असल्यास www.rogar.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर जावून Employment वर क्लिक करावे Job Seeker , Find a Job ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर JOBSEEKER LOGIN हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक आणि पासवर्ड क्रमांकाचा वापर करुन LOGN व्हावे. त्यानंतर Pandit Dindayal Upadhyay Jon Fair हा पर्याय निवडावा. अमरावती विभाग निवडून फिल्टर द्यावे. त्यानंतर आपल्याला अमरावती विभागातील रोजगार मेळाव्यांची यादी दिसून येईल. त्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय महारोजगार मेळावा शेगाव, जि. बुलडाणा ऑफलाईन दि. 2 फेब्रुवारी 2024 मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर Vaccancy List  या टॅबवर क्लिक करावे. I Agree  हा पर्याय निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदे दिसून येतील त्यानंतर Apply बटणावर क्लिक करावे. शेवटी Succcessfully Applied for the Job असा संदेश दिसेल. ऑनलाईन नोंदणी करताना काही अडचण आल्यास कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती या कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 0721-2661950 यावर किंवा ई- मेल rojgarddamravati@gmail.com  वर संपर्क करावा,

तरी इच्छुक उमेदवारांनी 2 फेब्रुवारीला संत गजानन महाराज अंभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव जि. बुलडाणा येथे स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांसह (ऑनलाईन सेवायोजन कार्ड, निवडणूक ओळखपत्र/आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, दोन पासपोर्ट फोटो, बायोडाटा व इतर आवश्यक साहित्यासह) रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन उपायुक्त द. ल. ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

00000


--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा