बुधवार, १७ जानेवारी, २०२४

महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय आविष्कार 2024 स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रतीक रघुवंशी राज्यात प्रथम

 

महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय आविष्कार 2024

स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी  महाविद्यालयाचा

प्रतीक रघुवंशी राज्यात प्रथम

अमरावती, दि. 17 :  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे दि. १२  ते १५ जानेवारी  या कालावधीत राज्यस्तरीय महाविद्यालय व विद्यापीठातील तरुण संशोधकांचे आविष्कार 2024 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कल्पकता, नाविन्यता, विचार, शोध, प्रतिभा, प्रगटीकरण, संशोधन या सर्व गुणांची कमी अधिक असणाऱ्या या स्पर्धेत अभियांत्रिकी विषयातील पदवी गटात अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अणुविद्युत विभागाच्या अंतीम वर्षाचा विद्यार्थी ‘प्रतीक रघुवंशी’ याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या संशोधनाचा विषय "एबल ग्लारोरा-ए नॉन सर्जिकल अँड नॉन अधेझिव्ह टाईप स्मार्ट बोन कंडनशन हिअरिंग एड युझिंग डोग ट्रान्राड्युरार" (Able Glasses A Non Surgical and Non Adhesive type smart bone conduction hearing aid using dome transducer) असा होता. प्रतिकच्या उत्तुंग यशाबद्दल महाविद्यालयीन  शिक्षकगण व अभियांत्रीकी क्षेत्रातील संशोधकांनी कौतूक केले आहे.

वर्तमानातील उद्योजकांना व लोकांना ज्या समस्या भेडसावतात त्यावर उपाय शोधण्याकरिता कल्पकतेला संशोधनाची जोड देण्यासाठी आवश्यक असलेला सक्षमपणा, स्टार्टअप व पेटंटसाठी असलेली गुणवत्तां ‘प्रतीक रघुवंशी’ याच्या संशोधनात जाणकार परीक्षकांना आढळून आली. या स्पर्धेत २३ विद्यापीठांतील जवळजवळ ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रतीक रघुवंशी हा आविष्कार २०२४ स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ चमूचा सदस्य होता. याचा त्यालाअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष आणि चिफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रतीक रघुवंशी यास प्रथम क्रमांकासाठी 35 हजार रुपये संशोधनवृत्ती देखील जाहीर झालेली आहे. ही रांशोधनवृत्ती त्याला विद्यापीठामार्फत प्रदान करण्यात येईल. प्रतीकच्या या यशात त्याचे मार्गदर्शक प्रा. ए. एम. शाह, विभाग प्रमुख डॉ. पी. आर. देशमुख, अधिष्ठाता संशोधन डॉ. आर. एम. गेटकर, व संस्थेचे प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले यांचे मोलाचे योगदान लाभले, असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा