मनुष्यबळाच्या सांख्यकीय माहितीचे विवरणपत्र
31 जानेवारीपर्यंत सादर करा
अमरावती, दि. 09 : अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये मनुष्यबळाचा सांख्यकीय माहितीचे त्रैमासिक विवरणपत्र दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावी, असे आवाहन कौशल, विकास, रोजगार व उद्योजकता उपआयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणा-या आस्थापनांनी त्याच्या आस्थापनेवर कार्यरत असणा-या सर्व कर्मचा-यांची (एकुण स्त्री/पुरुष) अशी सांख्यीकी माहीती प्रत्येक तिमाहीस, सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-१ (ER-१) मध्ये नियमीतपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.
त्या अनुषंगाने माहे डिसेंबर 2023 अखेर संपणा-या तिमाहीची नमुना ईआर-१ (ER-१) मधील त्रैमासिक सांख्यीकीय माहीती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम या कार्यालयाव्दारे चालु असून, अमरावती विभागातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांकडुन शंभर टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.
प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील (Employer Profile) मधील आवश्यक सर्व माहीती नोदवून तात्काळ अद्यावत करावा तसेच त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ (ER-१) किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास स्थानिक जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त श्री. ठाकरे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा