गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

आंबिया बहार सन 2024-25 फळ पीक विमा योजनेमध्ये जास्तीच जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा.

 आंबिया बहार सन 2024-25 फळ पीक विमा योजनेमध्ये जास्तीच जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा.

                                                   कृषी मंत्री धनंजय मुंडे

            अमरावती,दि.3:पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.

            या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणे बाबत अथवा न होणेबाबत घोषणपत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला सादर करणे आहे.जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

            अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस नोंदणीकृत भाडेकरार अनिवार्य आहे. या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे (0.10 हेक्कटर) आणि उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे) अशी मर्यादा राहील. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळूण जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.त्यासाठी फळपिकांचे उत्पादनक्षम वय पुढीलप्रमाणे राहील.

            आंबा,चिकू,काजू या फळपिकासाठी 5 वर्षे उत्पादनक्षम वय राहील लिंबू फळपिकासाठी 4 वर्षे संत्रा मोसंबी पेरू,सीताफळ यासाठी 3 वर्ष डाळिंब,द्राक्ष यासाठी 2 वर्ष,केळी,पपई,स्ट्रॉबेरी निरंक वय राहील.ही योजना पुढील प्रमाणे कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.जळगाव,नांदेड,यवतमाळ,सिंधुदुर्ग,कोल्हापूर,वर्धा,रत्नागिरी या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी असेल जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,छत्रपती संभाजी नगर,धाराशिव,अमरावती,अकोला,नागपूर,परभणी,रायगड,नंदुरबार या जिल्ह्यासाठी युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर ठाणे,पालघर,धुळे,पुणे,सांगली,लातूर,बुलढाणा,नाशिक,अहमदनगर,सोलापूर,सातारा,बीड,वाशिम या जिल्ह्यासाठी बजाज आलियांस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असेल.आंबिया बहार सन 2024-25 मध्ये फळपिक निहाय विमा संरक्षित रक्कम आणि योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र

फळपिक

विमा संरक्षक रक्कम

गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम  

शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दि.

1

द्राक्ष

380000

127000

दि.15ऑक्टोबर2024

2

मोसंबी

100000

33000

दि.31ऑक्टोबर2024

3

केळी

170000

57000

दि.31ऑक्टोबर2024

4

पपई

4000

13000

दि.31ऑक्टोबर2024

5

संत्रा

100000

33000

30 नोव्हेंबर 2024

6

काजू

120000

40000

30 नोव्हेंबर 2024

7

आंबा (कोकण)

170000

57000

30 नोव्हेंबर 2024

8

आंबा(इतर जिल्हे)

170000

57000

31 डिसेंबर 2024

9

स्ट्रॉबेरी

240000

80000

14 ऑक्टोबर 2024

10

डाळिंब

160000

53000

14 जानेवारी 2025

 

योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता सर्वसाधारण पने विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के असतो. मात्र कमी जिल्ह्यात तो जास्त असु शकतो.

            आंबिया बहार सन 2024-25 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके,समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे.अवेळी पाऊस,कमी/जास्त तापमान,वेगाचे वारे,गारपीट इत्यादी निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे.

            योजनेत सहभाग करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in) या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेब आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट (Add on Cover) या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आलेले असुन गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व या करीता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमीत व अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक/वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा.आंबिया बहारातील अधिसुचित योजनेच्या अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.असे कृषी आयुक्तालय पुणेचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा