गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

#अमरावती शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात पटकावले अव्वल स्थान केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत आयोजित स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये अमरावतीने ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिकेला ७५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनसीएपी) अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अमरावतीने २०० पैकी २०० गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा