ग्रामस्थांनी
पर्यटन स्थळी रोजगार निर्मिती करावी
- विभागीय आयुक्त पियुष सिंह
अमरावती, दि. 22 : आमझरी येथे नव्याने सुरु झालेले निसर्ग पर्यटन संकुल
व विकसित साहसी खेळ केंद्रामुळे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. येथील ग्रामस्थांनी वनविभागाने
उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा वापर करुन पर्यटकांना आवश्यक सेवा पुरवावी व रोजगार
निर्मिती करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा
मधील गावीलगड परिक्षेत्रातील आमझरी येथील पुनर्जीवित केलेल्या निसर्ग पर्यटन संकुल
व साहसी खेळ केंद्राचे उद्घाटन श्री. सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत
होते. यावेळी अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री. शैलेश नवाल, भारतीय डाकसेवेचे मुख्य
प्रबंधक डॉ. अजिंक्य काळे, उपवनसंरक्षक डॉ. सिवाबाला, विनोद शिवकुमार व विभागीय वन
अधिकारी श्रीमती पियुषा जगताप व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपीलाल
मन्नु धिकार उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. सिंह म्हणाले, साहसी क्रिडा खेळांच्या आयोजनातून
संयुक्त व्यवस्थापन समिती लोकसहभागातून वनसंवर्धानाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे रोजगाराला
चालना मिळणार आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणले की, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी
दर्जेदार व गुणवत्तापुर्ण सेवा पुरवाव्यात. यामुळे ग्रामस्थांना स्थानिक पातळीवर
रोजगार उपलब्ध होईल. त्यांना पुर्णपणे वनांवर अवलंबून रहावे लागणार नाही. जागतिक
मत्स्य दिनानिमीत्य वनखात्याने स्थानिक पातळीवर विकसीत केलेल्या ‘स्वर्ण महाशीर’ प्रजातीच्या
माश्यांचे लोकार्पण आमझरी येथील स्थानिक तळ्यात करण्यात आले.
आमझरी येथील पर्यटन संकुलाचे आरक्षणाकरिता www.magiclmelghat.com या संकेतस्थळाबाबत सहायक वनसंरक्षक इंद्रजीत निकम
यांनी माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला आमझरी येथील नागरीक, वन्यजीवप्रेमी
उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा