विभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजरा
अमरावती, दि. 26 : भारतीय संविधानाला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
विभागीय माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी सहायक संचालक गजानन कोटुरवार, माहिती सहायक विजय राऊत, श्रीमती पल्लवी धारव, स्वीय सहायक प्रदिप हिरुरकर, लेखापाल गजानन जाधव यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.
यावेळी प्रदर्शन सहायक हर्षदा गडकरी, वरिष्ठ लिपिक विश्वनाथ धुमाळ, मनोज थोरात, दिनेश धकाते, रूपेश सवई, वैशाली ठाकरे, नितीन खंडारकर, मनिष झिमटे, विजय आठवले, गणेश वानखेडे, रविंद्र तिडके, गजानन पवार, कोमल भगत आदी उपस्थित होते.
0000


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा