शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
अप्रेन्टीशिप पखवाडा
अमरावती, दि. 7 :औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, अमरावती येथे ॲप्रेन्टीशिप
पखवाडा दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या सभागृहात साजरा
करण्यात येत आहे. या पखवाड्याअंतर्गत आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ
उमेदवारीबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यांत येणार आहे. यात MSRTC, MSEDCL,
TATA MOTORS, RAYMOND, Amravati या आस्थापनांचे व्यवस्थापक प्रशिक्षणार्थ्यांना
Apprenticeship Portal बद्यलची माहिती व पोर्टल वर ऑन लाईन नोंदणी प्रक्रियेबाबत
माहिती देणार असून जिल्ह्यातील आय. टी. आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी या
कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्या सौ. एम.
डी. देशमुख यांनी केले आहे.
00000
|
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेन्टीशिप पखवाडा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा