अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जमात प्रमाणपत्र
तपासणीसाठी सूचना
अमरावती, दि. 8 : सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र
पडताळणीच्या अनुषंगाने प्रस्ताव कार्यालयास सादर करावयाचे वेळापत्रक प्रसिध्द
करण्यात आले आहे.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावती
कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या
जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या अनुसूचित जमातीचे
विद्यार्थी जे सन 2020-21 शैक्षणिक वर्षाकरीता वैद्यकीय, अभियांत्रिकी व व्यावसायिक
अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या
अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांनी आदी प्रमाण प्रणालीवर https://etribevalidity.mahaonline.gov.on वेबसाइटवर ऑनलाईन भरावा व त्यानंतर ऑनलाईन
केलेल्या प्रस्तावाची प्रत सर्व मूळ पुराव्याच्या प्रतिसह आपले तपासणीचे प्रस्ताव
शाळेमार्फत किंवा पालकांर्माफत परिपूर्ण प्रस्ताव दि. 15 नोव्हेंबर 2019 ते 31
मार्च 2020 पर्यंत या समिती कार्यालयास प्रत्यक्ष सादर करावा.
तसेच विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर
तपासणी होऊन त्यांचे प्रवेशाची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण व्हावी, त्यांचे
शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी या समिती कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांनी आपले जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रकरणासंदर्भात समिती कार्यालयाशी
संपर्क साधून सदर प्रकरणाचा पाठपुरावा करावा. विद्यार्थ्यांना त्यांनी दाखल
केलेल्या जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रृटी/चूक
किंवा अपूर्णता राहू नये यांची दक्षत घेण्यात यावी, असे आवाहन सहआयुक्त, अनुसूचित
जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावती हे करीत आहे.
तसेच सन 2020-2021 या सत्रात व्यावसायिक
अंभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मात्र समितीकडे यापूर्वीच प्रकरण दाखल करुन
समितीकडे प्रकरण प्रलंबित आहेत, अशाही विद्यार्थ्यांनी या कार्यालयातील प्रबंधक
शोभा चौहाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन
उपसंचालक (सं), अनुसूचित जमाती प्रमाणपत्र, तपासणी समिती, अमरावती यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा