माहिती अधिकारचा
निपटारा करण्यासाठी
निर्णय प्रणाली
सॉफ्टवेअर कार्यान्वित
Ø
ई-मेल दूरध्वनी नोंदणी आवश्यक
अमरावती, दि. 2 : माहितीच्या अधिकारातील
प्रकरणांचा निपटारा गतीने करण्यासाठी निर्णय प्रणाली हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात
आले आहे. यासाठी अर्जदारांनी ई-मेल, दूरध्वनी, पत्ता आदी अनूषंगिक माहिती भरणे
आावश्यक आहे.
माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्यांतर्गत
नागरिक शासकीय प्राधिकरणाकडे माहिती मागतात. या प्रक्रियेत जन माहिती अधिकारी व
प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांना माहिती मागणाऱ्या अर्जदाराचे योग्य माहिती देवून समाधान
करता यावे आणि आयोगाकडील प्रलंबित प्रकरणांचा गतीने निपटारा करता यावा, म्हणून
आयोगाच्या स्तरावर ‘निर्णय प्रणाली’ सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या
प्रक्रियेत संबंधित अर्जदारांना सुनावणीला उपस्थित राहण्याबाबतची नोटीस व पारीत
होणारे आदेश निर्णय प्रणालीद्वारे पाठविण्यात येणार आहे. निर्णय प्रणाली हे
सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यासाठी प्रत्येक कार्यालयांच्या जन माहिती अधिकारी व
प्रथम अपिलीय अधिकारी ई-मेल व दूरध्वनी क्रमांक संबंधिताकडून नमूद करुन घ्यावा,
तसेच अपिलार्थीने आयोगाकडे द्वितीय अपील सादर करतांना अर्जामध्ये त्यांचा ई-मेल व
दूरध्वनी क्रमांक आवर्जून नमूद करावा, असे कक्ष अधिकारी देविसिंग डाबेराव यांनी
कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा