वित्त, नियोजन मंत्र्यांकडून मंगळवारी
जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
अमरावती, दि. 21 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त, नियोजन मंत्री
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, दि. 28 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अमरावती
विभागातील जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे.
ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात होणार आहे. उपमुख्यमंत्री
अजित पवार विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन
2020-21 करिता जिल्हानिहाय बैठका घेतील. या बैठकीला संबंधित विभागप्रमुखांनी उपस्थित
राहावे, असे नियोजन उपआयुक्त यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा