मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली
गारपीटग्रस्त शेतीची पाहणी
Ø
गारपीटग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश
अमरावती, दि. 3 : राज्य मंत्रिमंडळात समावेशानंतर पहिल्यांदाच
दौऱ्यावर आलेल्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यातील शेंदूरबाजार येथील
गारपीटग्रस्त शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीकोनातून या
नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
श्रीमती ठाकूर यांनी सुरवातीला राजेंद्र घरडे यांच्या कापूस आणि
तूर पिकांची पाहणी केली. त्यानंतर राजेंद्र सावरकर यांच्या केळीच्या बागेची पाहणी
केली. यावेळी त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून गारपिटीने बाधित
झालेल्या गावांची आणि पिकांच्या क्षेत्राची माहिती घेतली.
यावेळी श्रीमती ठाकूर यांनी गेल्या काळातील अवेळी पाऊस आणि आताही
गारपीटीने अमरावतीसह विदर्भातील कापूस, तूर आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या भागातील
शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दोन दिवसांत नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याच्या
सूचना त्यांनी कृषि विभागाला दिल्या. शेतकऱ्यांना मदतीबाबत उपमुख्यमंत्री अजित
पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांना माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या
मदतीचा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मांडण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना मदत
करून त्यांना दिलासा देण्याचे काम निश्चितपणे करण्यात येईल, असे सांगितले.
श्रीमती ठाकूर यांचे विविध राष्ट्रपुरूषांना अभिवादन
अमरावती जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात श्रीमती ठाकूर यांनी आज
सकाळी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन
घेतले. यावेळी त्यांनी समाधीस्थळावर पुष्पार्पण केले. त्यानंतर त्यांनी ध्यान
केंद्रांलाही भेट दिली. तसेच त्यांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या
केंद्रीय कार्यालयाला भेट दिली. समितीच्या वतीने श्रीमती ठाकूर यांचा शाल, श्रीफळ
देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष जनार्दन बोथे गुरूजी उपस्थित
होते. श्रीमती ठाकूर यांनी समितीने आतापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त
केले. तसेच येत्या काळात समितीला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले
अमरावती येथील पंचवटीतील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला
पुष्पार्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखेडे,
जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन
देशमुख, विरेंद्र जगताप आदी उपस्थित होते. त्यानंतर श्रीमती ठाकूर यांनी इर्विन
चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा