वाढीव गुण
प्रस्ताव सादर करण्यास
25
फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 24 : शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविण्याचा
व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण
(अतिरिक्त गुण) देण्याचे प्रस्ताव विभागीय मंडळाकडे सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी
पर्यंत देण्यात आली होती. मार्च 2020 मधील इयत्ता 10 वी मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी
हे प्रस्ताव शाळेकडे सादर करण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत, तर शाळांनी विभागीय मंडळाकडे
प्रस्ताव सादर करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. असे
राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा