रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
अमरावती, दि. 18 : अमरावती-चांदूररेल्वे या राष्ट्रीय महामार्गाच्या
रेल्वे स्टेशन ते अंध विद्यालयापर्यंत कॉक्रीट रोड बांधकाम टप्प्याटप्प्यामध्ये करण्यात
येत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन
करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जेल क्वार्टर ते चपराशीपूरा चौक यामधील उजव्या बाजूचे
95 मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण काम सुरु आहे. हा रस्ता दि. 10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी
2020 पर्यंत डाव्याबाजूने असलेल्या पुर्ण झालेल्या दोन पदरामधून वाहतूक सुरु राहिल.
यासाठी पोलीस विभागाकडून परवानगी घेण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर
करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा