शासकीय स्थानिक सुट्या जाहिर
अमरावती, दि. 4 : विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी त्यांना प्रदान
करण्यात आलेल्या विशेषाधिकारानुसार स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत. दि. 3 ऑगस्ट
रोजी रक्षाबंधन, दि. 26 ऑगस्ट रोजी जेष्ठागौरी पूजन व दि. 17 सप्टेंबर 2020 रोजी सर्वपित्री
अमावस्येची सुटी ह्या संपूर्ण जिल्ह्याकरीता लागू राहील.
अमरावती जिल्ह्यातील दिवाणी फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना हा आदेश लागू होणार
नाही, असे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा