शिक्षक मतदारसंघ निवडणुक बातमी
शिक्षक मतदारसंघासाठी चार वाजेपर्यंत 68 टक्के मतदान
अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र विधान
परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज दि. 1 डिसेंबर मतदान झाले. सायंकाळी
चार वाजेपर्यंत 68.65 टक्के मतदान झाले. एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी 24 हजार 455
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात
77 मतदान केंद्रावर हे मतदान घेण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत 10.11 टक्के, दुपारी
12 वाजेपर्यंत 25.11 टक्के, दोन वाजेपर्यंत 46.71 टक्के, तर सायंकाळी चार वाजेपर्यंत
68.65 टक्के मतदान झाले. अमरावती विभागात एकूण 35 हजार 622 मतदार आहेत. यात 26 हजार
60 पुरूष तर 9 हजार 562 स्त्री उमेदवार आहेत. यातील 17 हजार 913 पुरूष, तर 6 हजार 542 स्त्री अशा एकूण 24 हजार
455 मतदारांनी मतदान केले.
अमरावती जिल्ह्यातील 10 हजार
386 मतदारापैकी 4 हजार 876 पुरूष आणि 2 हजार 150 स्त्री अशा 7 हजार 26 मतदारांनी मतदान
केले. अकोला जिल्ह्यातील 6 हजार 480 मतदारापैकी 2 हजार 954 पुरूष आणि 1 हजार 491 स्त्री
अशा 4 हजार 445 मतदारांनी मतदान केले. वाशिम जिल्ह्यातील 3 हजार 813 मतदारापैकी 2 हजार
185 पुरूष आणि 529 स्त्री अशा 2 हजार 714 मतदारांनी मतदान केले. बुलडाणा जिल्ह्यातील
7 हजार 484 मतदारापैकी 3 हजार 921 पुरूष आणि 1 हजार 103 स्त्री अशा 4 हजार 24 मतदारांनी
मतदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील 7 हजार 459 मतदारापैकी 3 हजार 977 पुरूष आणि 1 हजार
269 स्त्री अशा 5 हजार 246 मतदारांनी मतदान केले.
सायंकाळी चार वाजेपर्यंत जिल्हानिहाय
झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
आहे. अमरावती – 67.65 टक्के, अकोला -
68.60 टक्के, वाशिम – 71.18 टक्के, बुलडाणा – 67.13 टक्के, यवतमाळ – 70.33 टक्के.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा