बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

मत्स्यव्यावसायिकांनी पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन अनुदान योजनेचा लाभ घ्यावा

 

मत्स्यव्यावसायिकांनी पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन

अनुदान योजनेचा लाभ घ्यावा

 

        अमरावती, दि. 23 : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मत्स्यव्यावसायिकांना पाच पिंजयांचा वापर करुन मत्स्यसंवर्धन करण्याकरीता अनुदान देण्यात येत आहे. पिंजऱ्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता असून वाढ झाल्यास वाढीव पिंजऱ्यावरील अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. ही योजना पाच पिंजऱ्यांची असली तरी एकुण 18 पिंजऱ्यांपर्यंत, म्हणजे 13 पिंजरे स्वखर्चाने किंवा संपूर्ण 18 पिंजरे स्वखर्चाने जलाशयात टाकण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याबाबत मत्स्य उद्योजकांनी कोणत्या जलाशयात किती पिंजरे टाकण्याची तरतुद उपलब्ध आहे, याबाबतची माहिती संबंधित जिल्ह्याच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना  कक्षातुन घ्यावी.

            पिंजरा योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या व्यक्तीस अनुदान लाभ मिळु न शकल्यास स्वखर्चाने या योजनेचा लाभ घेता येईल. स्वखर्चाने लाभ घेण्याऱ्या अर्जदारांनी तसे नमूद करावे. अनुदान योजना लाभार्थी अंतिम झाल्यावर जागा उलब्धतेनुसार सर्व विनाअनुदानित पिंजरा योजनेच्या अर्जदारांचा विचार करण्यात येईल. अशी माहिती जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दिली आहे.

000000

            

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा