इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात
राष्ट्रीय
सेवा योजनेचे विविध उपक्रम
अमरावती,
दि. 23 : विदर्भ
युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय,
अमरावती राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि. 18 डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त
कार्यालय, वाहतूक विभाग येथे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यालयातील पोलिस
निरीक्षक प्रवीण काळे आणि त्यांचे सहकारी सुनिता कंगले, पुजा राठोड, गणेश काळे,
रोशन मिसाळ, पवन तिवारी, शिल्पा डोंगरे, संजिव काळे, श्री. दहातोंडे, कैलास राठोड,
पंकज खानंदे उपस्थित होते. तसेच 21 डिसेंबर रोजी गाडगे महाराज वृध्दाश्रमात मास्क,
सॅनिटायझर व फळवाटप करण्यात आले. यावेळी वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक डॉ. श्रीकांत
बोरसे उपस्थित होते.
दि. 22 डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता
अभियान आणि फळवाटप करण्यात आले. इंदिराबाई मेघे महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा
योजना आणि पुंडलिक प्रशासकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त वतीने जिल्हा सामान्य
रुग्णालयात विविध कार्यक्रम पार पडले. येथील रूग्णांना मास्क वाटप, सॅनिटायझर, फळ
आणि बिस्किटाचे वाटप करयात आले. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिसर स्वच्छता
अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी परीसर स्वच्छ केला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. लिना कांडलकर, रासेयो
अधिकारी प्रा. डॉ. पुनम देशमुख, प्रा. डॉ. सिमा अढाऊ, प्रा. डॉ. वंदना भोयर, प्रा.
अनुप आत्राम उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी कल्याणी हाडोळे, पपिहा शिंदे, शालिनी आठवले,
राधिका बोराडे, हर्षदा सावरकर, पलक पाठक, डिलेश्वरी नाईक, प्रज्ञा स्थुल यांनी पुढाकार
घेतला.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा