सोमवार, १४ डिसेंबर, २०२०

बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचा आधार

 

बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचा आधार

अमरावती, दि. 11 : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन जाहिर करण्यात आला. त्यानुसार सेवा क्षेत्रांसह उद्योगधंदेही बंद झाले. त्यामुळे अनेकांना रोजगार गमावावा लागला. परंतु लॉकडाऊनच्या काळात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने पाच ऑनलाईन रोजगार मेळावे घेतले. या मेळाव्यात जिल्हा, तसेच इतर जिल्ह्यातील उद्योजकांनी एक हजार 54 रिक्तपदे अधिसूचित केली होती. यामुळे बेरोजगारांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा आधार मिळाला.

जिल्ह्यात रोजगाराच्या संधी सिमीत आहेत. या पाच रोजगार मेळाव्यामध्ये चार हजार 317 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला. उद्योजकांनी सहभागी झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन पध्दतीने  मुलाखती घेतल्या. यात 339 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळाले.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील उद्योजकांनी एकूण एक हजार 119 पदे अधिसुचित केली आहेत. सदर रिक्तपदावर भरतीबाबत जिल्ह्यातील एकूण एक हजार 6 ऊमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोदविला आहे.

                                                     00000 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा