अनुकंपाधारक
उमेदवारांची ज्येष्ठता यादी प्रसिध्द; हरकती मागविल्या
अमरावती, दि.
10 : जिल्हाधिकारी यांच्या कडून अर्ज सादर केलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांची ज्येष्ठता
यादी प्रसिध्द करण्यात आाली असून आक्षेप/हरकती मागविण्यात आल्या आहेत.
दि. 1 जानेवारी,
2020 रोजीची (दि. 01.01.2018 ते दि. 01.01 2020) गट-क व गट-ड संवर्गात अर्ज सादर केलेल्या
अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती सामायिक ज्येष्ठता यादी nic.amravati.in या संकेत स्थळावर
तसेच जिल्हा नाझर जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांचे नोटीस बोर्डवर, प्रसिध्द करण्यात
आली असून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबधित कार्यालय प्रमुख यांना पाठविण्यात
आली आहे.
अनुकंपाधारक
उमेदवारांची (गट-क व गट-ड) तात्पुरती सामायिक ज्येष्ठता यादीवर आक्षेप/हरकती असल्यास
संबधित कार्यालय प्रमुख यांचे मार्फत लेखी पुराव्यासह आक्षेप/हरकती प्रेसनोट प्रसिध्द
झाल्यापासुन 15 दिवसाचे आत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे. विहीत मुदतीनंतर प्राप्त
आक्षेप/हरकतीचा विचार करण्यात येणार नाही असे पत्रकात नमुद आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा