राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या
इयत्ता पाचवी व
आठवीत प्रवेशासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ
अमरावती दि.04
(विमाका):- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व
आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव
नोंदणी प्रवेश अर्ज दिनांक 1 फेब्रुवारी 2022 ते 28 फेब्रुवारी या कालावधी निश्चित
करण्यात आल होता. सदर कालावधी संपुष्टात आला आहे. परंतु या ऑनलाईन नावनोंदणी
प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी अर्ज दिनांक 1
मार्च ते 31 मार्च 2022 पर्यंत सादर करता
येतील. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद
केलेल्या संपर्क केंद्र दि. 2 मार्च ते
दि. 4 एप्रिल 2022 पर्यत शाळेमध्ये जमा करावे. संपर्क केंद्र शाळांनी
विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात दि. 7
एप्रिल पर्यंत जमा करावी.
मुक्त विद्यालय
मंडळाच्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळाचा वापर करावा,
असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास
नरड यांनी कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा