इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या
विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती
अमरावती दि.3
(विमाका): इयत्ता बारावीची मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात
येणाऱ्या लेखी परीक्षा दिनांक 4 मार्च ते 7 मार्च 2022 व दहावी लेखी परीक्षा दि. 15
मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीन पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती,
नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या
भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत
करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती
करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
१) ८४३२५९२३५८ २) ७२४९००५२६० ३) ७३८७४००९७० ४)
९३०७५६७३३० ५) ८९७५४७८२४७
६) ७८२२०९४२६१ ७) ९५७९1५९१०६ ८) ९९२३०४२२६८
9) ७४९८११९१५६ १०)८९५६९६६१५२
वरीलप्रमाणे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षा कालावधीत
सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना
भ्रमणध्वनीव्दारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी
परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यादींबाबत समुपदेशकांना
विचारणा करू नये असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा