बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
अमरावती दि.4
(विमाका): राज्य शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल
2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता
बारावीची परीक्षा दि. 4 मार्च ते 30
मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार या परीक्षेचे वेळापत्रक
मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना
देण्यात आलेले आहे. परीक्षेच्या या वेळापत्रकात अंशत बदल करण्यात आला असल्याचे
राज्य मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी (General & Biofocal) आणि व्यावसायिक (M.C.V.C)
परीक्षा दि. 5 मार्च व दि. 7 मार्च रोजी आयोजित
करण्यात आली होती. परंतु अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव या विषयांच्या परीक्षा नियोजित
तारखांऐवजी अनुक्रमे दि. 5 एप्रिल व दि. 7
एप्रिल 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात
इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात
आलेला नाही. वेळापत्रकातील अंशत: बदलाची सर्व संबंधीत उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे
मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी,
असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा