इयत्ता अकरावी व बारावीकरीता
सुधारीत विषय योजना व मुल्यमापन योजना
अमरावती दि.4
(विमाका) : कनिष्ठ महाविद्यालयातील विविध घटकांच्या मागणी नुसार विज्ञान
शाखेसाठी ग्रुप सी मधुन वगळण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र विषयांस प्रविष्ठ
विद्यार्थ्यांना सन 2022 च्या बारावीच्या परिक्षेस संधी देण्याबाबत व ग्रुप बी व
ग्रुप सी मधून घ्यावयाच्या वैकल्पिक विषयांच्या संख्येच्या मर्यादांच्या फेरविचार
करण्यात आला असुन त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत.
विषययोजनेत कला
शाखेसाठी शिक्षणशास्त्र हा विषय ग्रुप सी मध्येच समाविष्ट असेल. कला व वाणिज्य शाखांसाठी
आठ विषयांची निवड करताना ग्रुप ए मधील चार विषय पूर्वीप्रमाणे अनिवार्य असतील. उर्वरित
चार वैकल्पिक विषयांची निवड करताना ग्रुप बी मधून किमान दोन विषय निवडावे लागतील आणि
उर्वरित दोन विषयांसाठी ग्रुप बी मधून शून्य, एक किंवा दोन आणि ग्रुप सी मधून शून्य,
एक किंवा दोन या मर्यादेत ग्रुप बी आणि सी मधून एकूण दोन विषयांची निवड करता येईल.
विज्ञान शाखेसाठी
विज्ञान शाखेसाठी
शिक्षणशास्त्र हा विषय ग्रुप सी मधून वगळण्यात आलेला आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी
पूर्वीच्या विषय योजनेनुसार विषयांची निवड केलेली आहे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ
नये म्हणून विज्ञान शाखेसाठी ग्रुप सी मधून वगळण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र विषयास
प्रविष्ट विद्यार्थ्यांना सन 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेस
बसण्याची एकमेव संधी देण्यात येत आहे. तथापि परीक्षेमध्ये शिक्षणशास्त्र विषयात विद्यार्थी
उत्तीर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या विषययोजनेनुसार तोच विषय घऊन परीक्षेस
प्रविष्ट होता येईल.
शैक्षणिक वर्ष
सन 2021-22 पासून इयत्ता 11 वी व शैक्षणिक वर्ष सन 2022-23 पासून इयत्ता बारावीसाठी
अशी सवलत देय असणार नाही. असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा